SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता भारतात 5G तंत्रज्ञान ‘या’ वर्षी लॉंच होणार, तुम्हालाही मिळणार 5G नेटवर्क, वाचा..

मोबाईल आणि नेटवर्क यामध्ये सातत्याने काही न काही नवीन तंत्रज्ञान येत असताना भारतात 5G ची चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून ती मे 2022 पर्यंत चालण्याचा अंदाज आहे. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉंचची वाट पाहत आहे. परंतु, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. पण आता दूरसंचार विभागाने लवकरच 5G लाँच करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, सुरुवातीला 5G हे भारतातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, गुरुग्राम, बेंगळूरु, हैद्राबाद आणि पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये सर्वात आधी लाँच होईल, अशी माहिती भारतीय दूरसंचार विभागाने दिली आहे.

Advertisement

गुरुग्राम, बेंगळूर, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैद्राबाद आणि पुणे या शहरांत मागील 2 वर्ष टेलिकॉम कंपन्या चाचण्या करत आहेत. व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल (Vodafone, Idea, Reliance Jio, Airtel) आधीच या शहरांमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत. हे लॉंचिंग व्यावसायिकदृष्ट्या होणार आहे.

5G साठी नवीन स्पेक्ट्रमचा लिलाव मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे आणि त्यानंतर 5G नेटवर्क (5G Network) लाँच केले जाईल, स्पेक्ट्रमच्या (Spectrum) किंमतीबाबत सध्या अधिकृत माहीती नसली तरी मार्केटमध्ये 5G उपकरणे दाखल होणे आणखी वेगाने होण्यास सुरुवात होईल. आता फक्त 5G लॉंच होण्यास काही महिनेच फक्त वाट पाहावी लागणार आहे. स्मार्टफोन निर्मात्यांनी आता 4G फोन लाँच करणे कमी केले आहे.

Advertisement

गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत शेकडो 5G स्मार्टफोन (Smartphone) लॉंच करण्यात आले आहेत. 5G योजना, रिचार्ज देखील महाग राहण्याची शक्यता असून शकते. मात्र ग्राहकांना उपलब्ध होणारं 5G नेटवर्क कधी येणार, महाग असेल कि स्वस्त, यावर 5G कनेक्टिव्हिटीच्या किंमतीचा अंदाज पुढील वर्षी होणाऱ्या 5G स्पेक्ट्रमच्या मार्च-एप्रिल 2022 दरम्यानच्या लिलावानंतरच लावता येणार आहे, अशी माहिती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement