SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सीम कार्डच्या नियमांत मोठे बदल, मोबाईलधारकांचा होणार चांगला फायदा..!

मोबाईल वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे.. मोदी सरकारने सीम कार्ड वापराच्या नियमांत महत्वपूर्ण बदल केले आहेत. सीमकार्ड घेताना नागरिकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. मात्र, आता त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात सीमकार्ड वापराच्या नियमांत अनेक मोठे बदल करण्यात आलेत.

Advertisement

आता मोबाईल कनेक्शन घेणे किंवा प्रीपेडवरून पोस्टपेड असो वा पोस्टपेडवरुन प्रीपेड सीम कार्ड रूपांतरित करायचे झाल्यास त्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तसेच ‘केवायसी’बाबतही मोठी निर्णय घेतला आहे..

स्वतः ऑनलाइन ‘केवायसी’ करता येणार
आता नवीन मोबाईल क्रमांक घेण्यासाठी पूर्वीसारखी कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. डिजिटल पद्धतीने ‘केवायसी’ केली जाणार आहे.. वापरकर्त्यांना स्वतः ऑनलाइन ‘केवायसी’ करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अॅपवर आधारित असून, ई-केवायसीसाठी फक्त एक रुपये शुल्क भरावे लागेल.

Advertisement

प्री-पेड वरुन पोस्ट-पेड किंवा पोस्ट-पेड वरुन प्री-पेडमध्ये सीमकार्ड करताना नव्याने ‘केवायसी’ करावी लागणार नाही.. आता केवायसी एकदाच भरावा लागणार आहे. तसेच सीम कार्ड पोर्ट करताना कोणताही फॉर्म भरावा लागणार नसून, आता ही सगळी प्रक्रिया डिजिटली होणार आहे.

वेळ व पैसा वाचणार..
यापूर्वी सीम कार्ड घेण्यासाठी नवीन फॉर्म भरण्यापासून ते पोर्टिंग करताना, प्रत्येक वेळी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारखी कागदपत्रे, तसेच फोटो व सहीदेखील द्यावी लागत होती.

Advertisement

बऱ्याचदा टेलिकॉम कंपन्यांकडून डिजिटल ‘केवायसी’ प्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यात अनेकदा ग्राहकांच्या नावावर चुकीची कागदपत्रे अपलोड केल्याचे समोर आले होते.. पण आता तुम्ही घरबसल्या ‘सेल्फ केवायसी’ करू शकता. त्यामुळे नागरिकांचा वेळ नि पैसा दोन्ही वाचणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement