SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

परदेशातही वाहन चालविण्याचा आनंद घेता येणार..! या देशांमध्ये चालते भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स..!

ड्रायव्हिंग लायसन्स.. अर्थात वाहन चालविण्याचा परवाना..! भारतात कुठेही स्वत:च्या वाहनाने फिरायचे झाल्यास वाहन परवान्याशिवाय शक्य नाही.. तसा प्रयत्न केल्यास खिशाला मोठी झळ बसू शकते..

वाहन परवान्यावर भारतात कुठेही बिनदिक्कत फिरता येते… पर्यटनाचा आनंद घेता येतो. मात्र, परदेश वारी करण्याचा योग आला.. नि तेथे तुमच्या हाती गाडीचे स्टेअरिंग आले तर.. तेथे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकेल का..?

Advertisement

जगभरातील अनेक पर्यटक भारतात येतात.. तसेच मोठ्या संख्येने भारतीय पर्यटही परदेशात जातात. मात्र, भारतीय पर्यटक सहसा खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. कारण, आपल्या खासगी वाहनांना अनेक देशांमध्ये चालविण्याची परवानगी नसते.

तसेच आपले ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’ही तेथे निरुपयोगी ठरते. मात्र, जगात असे 20 देश आहेत, जेथे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’च्या साहाय्याने प्रवासाचा आनंद घेऊ शकता… असे कोणते देश आहेत, जेथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकते, ते जाणून घेऊ या..

Advertisement

ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये भारताप्रमाणेच रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवण्याची पद्धत आहे. तेथील साउथ वेल्स, क्विन्सलँड, कोस्टल ऑस्ट्रेलिया, तसेच कॅपिटल टेरिटरीमध्ये वाहन चालवू शकता. उत्तर ऑस्ट्रेलियात फक्त तीन महिने गाडी चालवण्याची परवानगी मिळते. मात्र, लायसन्स इंग्रजीत असावे.

युनायटेड किंग्डम
इंग्लंड, स्कॉटलंड नि वेल्स या तीन देशांचा समावेश असलेल्या युनायटेड किंग्डमच्या रस्त्यांवर तुम्ही एका वर्षासाठी भारतीय पासपोर्टसह गाडी चालवू शकता. तथापि, फक्त लहान मोटार व मोटारसायकल चालवण्याची परवानगी आहे..

Advertisement

जर्मनी
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर जर्मनीमध्ये सहा महिन्यांसाठी गाडी चालविता येते, परंतु ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची जर्मन किंवा इंग्रजी प्रत काढून, स्थानिक अधिकार्‍यांशी संवाद साधावा, कारण बहुतेक अधिकारी हीच मागणी करतात.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर येथे एका वर्षासाठी गाडी चालवू शकता. मात्र, तुमचा परवाना इंग्रजीत असावा. तुम्हाला एका वर्षानंतर ‘यूएसए’चा परवाना काढावा लागतो..

Advertisement

दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही देशाचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स चालते. फक्त ड्रायव्हिंग लायसन्सवर फोटो आणि स्वाक्षरीसह इंग्रजीत असावे. भाड्याने कार घेतल्यास किंवा नवी कार घेतल्यास दक्षिण आफ्रिकेच्या नियमांनुसार दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागते.

नॉर्वे
युरोपमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे नाॅर्वे. येथे तीन महिन्यांसाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालते.

Advertisement

स्वीडन
स्वीडनच्या रस्त्यावर गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी, स्वीडिश, जर्मन, फ्रेंच किंवा नॉर्वेजियन भाषेत असावे. सरकार तुम्हाला एक वर्षापर्यंत वाहन चालवण्याची परवानगी देते.

न्यूझीलंड
न्यूझीलंडचे अधिकारी तुम्हाला एका वर्षासाठी कोणत्याही त्रासाशिवाय तेथे वाहन चालवू देतात, पण कार चालविण्यासाठी तुमचे किमा वय 21 वर्षे असावे.

Advertisement

स्वित्झर्लंड
कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय स्वित्झर्लंडमध्ये संपूर्ण वर्षभर कुठेही जाऊ शकता, पण ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीत असावे.

फ्रान्स
फ्रान्समध्ये यूएस, युरोपियन देशांप्रमाणे रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालतात. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सची फ्रेंच भाषांतरित प्रत बाळगल्यास, एका वर्षासाठी वाहन चालविता येते.

Advertisement

भूतान
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह येथे दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविता येते. मात्र, तुमच्याकडे वैध परवान्यासह आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवानाही असणे आवश्यक आहे.

या देशांतही चालेल..
दरम्यान, याशिवाय मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, कॅनडा, आयर्लंड, स्पेन, आइसलँड, इटली, फिनलंड या देशांमध्ये भारतीय लायसन्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येईल..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement