SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या कॅश व्यवहारावर इन्कम टॅक्सची नजर, कधी येऊ शकते इन्कम टॅक्स खात्याची नोटीस, वाचा..!

गेल्या काही दिवसांत ‘इन्कम टॅक्स’ विभाग मोठ्या प्रमाणात सतर्क झाला आहे. देशभरात रोज कुठे ना कुठे छापेमारी सुरु असून, कानाकोपऱ्यात दडवून ठेवलेला ‘काळा पैसा’ बाहेर येत आहे..

बॅंकांमधून केल्या जाणाऱ्या व्यवहारावर प्राप्तीकर विभागाचा ‘तिसरा डोळा’ कायम नजर ठेवून असतो. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवहार केल्यास, कर चुकवेगिरी केल्यास ‘इन्कम टॅक्स’ विभागाच्या नजरेतून ही बाब सुटू शकत नाही..

Advertisement

प्राप्तीकर विभागाने गेल्या काही दिवसांत बँकेसह म्युच्यूअल फंड हाऊस (Mutual Fund House), ब्रोकर प्लॅटफॉर्म (Broker Platform) आदी ठिकाणी केल्या जाणाऱ्या रोख व्यवहारांवर कठोर नियम केले आहेत.

बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस, प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे मोठ्या रकमेचे रोखीचे व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तीकर विभागाला देणे बंधनकारक आहे, नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आलीच म्हणून समजा.. अशाच काही अडचणीत आणणाऱ्या रोख व्यवहाराबाबत जाणून घेऊ या.

Advertisement

बँक मुदत ठेव
बॅंकेत मुदत ठेव (Fixed Deposit) म्हणून एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास त्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाशी शेअर केली जाते. त्यात कॅश ट्रान्झक्शन शिवाय डिजिटल ट्रांजक्शन आणि चेकबूकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराचाही समावेश आहे. बँकेत लिमिटपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट केल्यास इन्कम टॅक्सकडून नोटीस (income tax) येऊ शकते.

बँक बचत खाते जमा
बॅंकेतील बचत खात्यातून एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये कॅश काढली वा जमा केल्यास ही माहिती बँकेकडून ‘इन्कम टॅक्स’ विभागाला दिली जाते. त्यात डिजिटल व्यवहारांचा समावेश नाही. चालू खात्यासाठी कॅश लिमिट 50 लाख रुपये आहे.

Advertisement

क्रेडिट कार्डचे बिल
एका आर्थिक वर्षात क्रेडिट कार्ड बिलाच्या रूपात एक लाखापेक्षा जास्त कॅश जमा केल्यास त्याची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला दिली जाते. क्रेडिट कार्डचे बिल आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त झाले, तरीही टॅक्स विभाग नोटीस पाठवू शकते. त्यात डिजिटल व्यवहाराचाही समावेश होतो.

प्रॉपर्टीमधील गुंतवणूक
प्रॉपर्टीमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास, रजिस्ट्रारकडून त्याची माहिती टॅक्स विभागाकडे जाते. त्यात कॅश नि डिजिटल व्यवहाराचा समावेश होतो.

Advertisement

शेयर, म्युचुअल फंड, बाँड खरेदी
शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बाँड्समध्ये आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचे रोख व्यवहार करता येतात. त्यामुळे कुठेही गुंतवणुक करताना, मोठ्या प्रमाणात रोकड वापरू नका.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement