देशात गेल्या सात-आठ दिवसभरात सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली, तर चांदी थोडी महाग झाली. आजपासून नवीन व्यापारी आठवडा सुरू होत आहे. गेल्या आठवड्यात सराफ बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या, तर चांदीचा आलेख वाढता आहे, म्हणजेच चांदी थोडी महाग झाली.
भारतात दररोज शनिवार-रविवार सोडता सोने व चांदीचे दर जाहीर होतात. 22 कॅरेट व 18 कॅरेट सोने व चांदीचे किरकोळ भाव कसे आहेत, हे माहीत करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे (SMS) दर तुम्हाला येऊन जातील. यासोबतच, जर तुम्हाला दररोज अपडेट्स हवे असतील, तर तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.
गेल्या शुक्रवारी सोन्याचा भाव 28 रुपयांनी खाली येऊन 48264 रुपयांवर आला आणि त्याआधी गुरुवारच्या दिवशी सोन्याचा भाव 48292 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. शुक्रवारी चांदीच्या भावात जराशी वाढ झाली. शुक्रवारी चांदी 81 रुपयांनी महाग होऊन 61883 रुपये प्रति किलोवर बंद झाली. दुसरीकडे गुरुवारी चांदीचा भाव 61802 प्रति किलोवर बंद झाल्याचं दिसलं.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवे दर:
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा नवीन भाव 48264 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोन्याचा दर 48071 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 44210 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा भाव 36198 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि सोन्याचा भाव 28234 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता.
सोने-चांदी स्वस्तच स्वस्त!
मागील आठवड्यात शुक्रवारच्या दिवशी सोन्याचा भाव 7936 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली झाला. मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने चांगला उच्चांक गाठला, त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याचवेळी चांदी बघता बघता 18097 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो असा आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार..
सोने: कॅरेट… 20 डिसेंबर रोजी प्रति 10 ग्रॅम किंमत… 24 डिसेंबर रोजी प्रति 10 ग्रॅमचा दर… किती रुपयांनी झाले स्वस्त
1) 24… 48527… 48264… 263
2) 23… 48333… 48071… 262
3) 22… 44451… 44210… 241
4) 18… 36395… 36198… 197
5) 14… 28388… 28234… 154
➖➖➖➖➖➖➖➖
🤑 आता Paytm वापरून पेमेंट करा आणि गॅरेंटेड कॅशबॅक मिळवा!
💰 त्यासाठी Paytm डाउनलोड करा आणि कुणालाही १ रुपया पाठवा, त्यासाठी लगेच क्लिक करा 👉 https://p.paytm.me/xCTH/5dcbabb3