SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सांगलीच्या गावातून आलेला तरुण बनला ‘बिग बॉस-3’ चा विनर, वाचा रंजक प्रवास..

‘बिग बॉस मराठी सिझन-3 च्या टॉप 5 मधून कोणता सदस्य बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता ठरणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर चाहत्यांची उत्सुकता संपली असून ‘बिग बॉस मराठी सिझन-3’ या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता सांगलीचा अभिनेता विशाल निकम बनला आहे.

छोट्याशा गावातून आलेला ठरला विजेता..

Advertisement

विशाल निकम ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ (Bigg Boss Marathi 3) मध्ये विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांत अखेरची चुरस रंगली होती.

ग्रँड फिनाले सुरु झाल्यावर काही वेळातच मीनल आणि उत्कर्ष यांची एक्झिट झाली. मग त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विकास पाटील याचाही प्रवास येथीच संपला. अशा वेळी शेवटी जय आणि विशाल यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं, पण शेवटी अभिनेता विशाल निकमने बाजी मारत स्पर्धा जिंकली.

Advertisement

बिग बॉसच्या घरात या सिझनमध्ये एकूण 17 जणांनी प्रवेश केला होता. या स्पर्धेत विजयी अभिनेता विशाल निकमला ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये घरातून बाहेर पडणार्‍या स्पर्धकांनी वेगवेगळ्या गाण्यांवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

विशाल निकमबद्दल थोडंसं….

Advertisement

विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील देविखिंडी येथे झाला असल्याने तो मूळचा याच गावातील आहे. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे, हे त्याची शरीरयष्टी पाहूनच आपल्याला समजेल. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, बिग बॉसच्या घरातील वावर, स्पष्टवक्तेपणामुळे विशाल नेहमीच चर्चेत राहिला.

छोटयाशा गावातून आलेल्या विशालने त्याच्या चित्रपट करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर विशालने ‘धुमस’ या मराठी सिनेमातही काम केले; परंतु त्याला ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या टीव्ही मालिकांमुळे जास्त लोकप्रियता मिळाली आणि तो घराघरांत पोहोचला.
➖➖➖➖➖➖➖➖
🤑 आता Paytm वापरून पेमेंट करा आणि गॅरेंटेड कॅशबॅक मिळवा!

Advertisement

💰 त्यासाठी Paytm डाऊनलोड करा आणि कुणालाही १ रुपया पाठवा, त्यासाठी लगेच क्लिक करा 👉https://p.paytm.me/xCTH/5dcbabb3

➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement