SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आरोपींच्या गोळीबारात कृष्णप्रकाश जखमी..! पुण्यात उडाली थरारक चकमक..!

पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यादरम्यान पोलिस व आरोपींमध्ये बराच वेळ चकमक उडाली.. त्यात पुण्याचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील गजबजलेल्या काटे पुरम चौकात तडीपार गुंड गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी भरदिवसा 10 गोळ्या झाडून योगेश जगताप याची हत्या केली होती. या घटनेमुळे पुणे शहर हादरले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सात जणांना अटक केली.

Advertisement

मात्र, मुख्य सूत्रधार गणेश मोटे व अश्विन चव्हाण घटनेनंतर पसार झाले होते. दोन्ही आरोपींच्या शोधासाठी संपूर्ण पोलिस आयुक्तालय कामाला लागले होते. त्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंडा स्कॉड व गुन्हे शाखेचे चार युनिट आरोपींचा कसून शोध घेत होते.

असा घडला थरार..
दरम्यान, कोये परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या सगळ्या परिसराली वेढा घातला.. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच, आरोपींनी थेट पोलिसांवरच गोळीबार सुरु केला.

Advertisement

आरोपींच्या गोळीबाराला पोलिसांनीही चोख प्रतिउत्तर देत गोळीबार सुरु केला. जवळपास अर्धा तास ही चकमक सुरू होती. अखेर आरोपींच्या दोन्ही पिस्तूलातील गोळ्या संपल्या नि अखे ते शांत झाले. गोळीबार शांत होताच, पोलिसांनी लपून बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण व महेश माने यांच्यावर झडप घेतली.

आरोपींवर ओंडका फेकला..
सगळ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, आरोपींच्या या गोळीबारात पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाले..

Advertisement

पोलिसांवर गोळीबार करुन अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याच वेळी आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांना आडवे गेले. त्यांनी बाजूला पडलेल्या लाकडाचा भला मोठा ओंडकाच पळणाऱ्या आरोपींच्या छातीवर फेकून मारली..

झाडाच्या ओंडक्याच्या माराने तीनही आरोपी खाली कोसळले. त्यानंतर इतर पोलिसांनी आरोपींना तातडीने जेरबंद केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अमृतकर यांनी दिली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement