कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने माेदी सरकारने 15 ते 18 वर्षांच्या मुलांच्या कोविड लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणास सुरुवात होणार आहे.. केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिन लसच त्यांना दिली जाईल..
तसेच, केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी, फ्रंन्टलाइन वर्कर्स यांनाही येत्या १० जानेवारी २०२२ पासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, हा बुस्टर डोस घेण्यासाठी कोविडचा दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे..
Union Health Ministry issues guidelines for COVID19 vaccination of children between 15-18 years, precaution dose to health care & frontline workers, and 60+ population with comorbidities
— ANI (@ANI) December 27, 2021
Advertisement
तसेच, गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांनाच हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. सरसकट ज्येष्ठ नागरिकांना ‘बूस्टर डोस’ दिला जाणार नाही. डॉक्टरांनी सुचवलं, तरच ज्येष्ठांना बूस्टर डोस घेता येणार आहे. त्यासाठीही दुसरा डोस घेऊन ९ महिने झालेले असणं गरजेचं आहे.
15 ते 18 वर्षांच्या मुलांचे कोविड लसीकरण, तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स व ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत मोदी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्याबाबत जाणून घेऊ…
१५ ते १८ वयोगटासाठी नियम..
– ज्या मुलांचे वय १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तसेच ज्यांचा जन्म २००७ किंवा त्यापूर्वी झालेला असेल, तरच लस देण्यात येणार.. त्यांना ‘कोविन’ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
– कोविनवरील सध्याच्या किंवा नव्याने अकाउंट तयार करुन नोंदणी करता येईल. त्यासाठी मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.
– लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही ‘फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोड’द्वारे नोंदणी करता येईल.
– लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट (वॉक-इन) नोंदणी करता येणार आहे.
– १५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लसच दिली जाणार आहे..
– ही नियमावली ३ जानेवारी २०२२ पासून लागू होणार असून, त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातील..
बूस्टर डोससाठी नियमावली..
– आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स व ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेले नागरिक बूस्टर डोससाठी पात्र असतील, त्यांनाही सध्याच्या कोविन अकाउंटवरुनच ‘बूस्टर डोस’साठी नोंदणी करावी लागणार.
– पात्र नागरिकांनी दुसरा डोस कोणत्या तारखेला घेतलाय, त्यावरच ‘बूस्टर डोस’ घेता येणार.
– दुसऱ्या डोसनंतर ‘बूस्टर डोस’साठी तारीख ‘ड्यू’ असेल, त्यापूर्वी कोविन सिस्टिममकडून ‘एसएमएस’ पाठवण्यात येईल.
– बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार.
– बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.