SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पत्नीला मिळणार दरमहा 45 हजार रुपयांची पेन्शन… मोदी सरकारची गृहिणींसाठी खास योजना..!

नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हातात पैसा येत असल्याने त्यांचे भविष्य सुरक्षित करु शकतात. मात्र, घर सांभाळणाऱ्या गृहिणींचे काय..? त्यांच्या कष्टाचे काहीच मोल पदरी पडत नाही.. अशा गृहिणी असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे..

मोदी सरकारने अशा गृहिणींसाठी खास योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून या महिला भविष्यात आर्थिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर होऊ शकतील.. या योजनेचे नाव आहे, राष्ट्रीय पेन्शन योजना.! अर्थात ‘एनपीएस’ योजना..!

Advertisement

मोदी सरकारने घरातील गृहिणींसाठी ही विशेष योजना सुरु केली आहे. ही एक प्रकारे गुंतवणूक योजनाच आहे. मात्र, त्याद्वारे आयुष्याच्या उतार वयात तुमच्या पत्नीच्या नावे पेन्शन मिळू शकते. पत्नीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते..

अशी करा गुंतवणूक..
‘एनपीएस’ (NPS) योजनेत दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करता येतात. या योजनेत पत्नीच्या नावे खाते सुरु करुन दरमहा त्यात एक हजार रुपयांचीही गुंतवणूक करु शकता.. या योजनेतील खाते 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. मात्र, तुम्ही पत्नीच्या 65 व्या वर्षांपर्यंतही खाते सुरू ठेवू शकता.

Advertisement

दोन प्रकारची खाती
‘एनपीएस’ योजनेत ‘टीयर-1’ नि ‘टीयर-2’ अशी दोन प्रकारचे खाती आहेत. त्यात ‘टीयर-1’मधील खात्यात पैसे गुंतवल्यास मुदतीपूर्वी काढता येत नाहीत. मुदत संपल्यानंतरच हे पैसे काढू शकता.

‘टीयर-2’ खाते सुरू करण्यासाठी ‘टीयर-1’मध्ये खाते असायला हवं. त्यात इच्छेनुसार पैसे जमा करू शकता अथवा रक्कम काढू शकता.

Advertisement

कोण गुंतवणूक करू शकतो?
‘एनपीएस’ योजनेत 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय खाते सुरू करू शकतो. एका व्यक्तीला एकच खाते सुरू करता येते. त्यात संयुक्त खाते असू शकत नाही..

योजनेतील गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळेल, हे मात्र निश्चित नाही. आतापर्यंत मिळालेला परतावा पाहिल्यास, गुंतवणुकदारांना जवळपास 10 ते 11 टक्के परतावा मिळू शकतो.

Advertisement

किती पेन्शन मिळणार..?
समजा, तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे आहे. तिच्या ‘एनपीएस’ खात्यात दरमहा 5000 रुपये जमा केले नि त्यावर वार्षिक 10 टक्के परतावा मिळाल्यास पत्नीच्या 60 व्या वर्षी खात्यात 1.12 कोटी रुपये जमा होतील. त्यातील जवळपास 45 लाख रुपये पत्नीला मिळतील. शिवाय दरमहा 45 हजार रुपयांच्या आसपास पेन्शन मिळेल. ही पेन्शन त्यांना आजीवन मिळणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement