SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! वर्षाअखेरीस शेतकऱ्यांवर कोसळणार मोठे संकट..

शेतकऱ्यांसाठी हे वर्ष संमिश्र राहिलं.. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पुरता वाया गेला.. त्यानंतर सगळ्या आशा रब्बी हंगामावर लागलेल्या असताना, पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी झाली. परिणामी, शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं..

आता नवीन वर्षाच्या  स्वागताची तयारी सुरु असताना, पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आहे.. या वर्षाअखेरीस पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळणार असल्याची भीती व्यक्त होत आहे..

Advertisement

भारतीय हवामान खात्याने राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील दोन दिवसांत, म्हणजेत 28 व 29 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आजपासून (26 डिसेंबर ) वायव्य भारत व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे.

परिणामी, महाराष्ट्रात 28 व 29 डिसेंबरला मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

उत्तर भारतातून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा विक्रमी घसरला होता, पण आता उत्तर भारतात थंडीची लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यातील गारठाही कमी होणार आहे. पुढील पाच दिवस देशात कुठेही थंडीची लाट येण्याची शक्यता नाही.

सध्या राज्यात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, ऐन थंडीत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय..

Advertisement

पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
सध्या शेतात खरीप हंगामातील शेवटचे तुरीचे पीक काढण्याच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. शिवाय कांदा काढणीचे कामही जोरात सुरु आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यास या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे..

ढगाळ हवामान राहिल्यास रब्बी पिकांवरही राेगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांवर औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे..

Advertisement

तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा https://jio.sh/puUrE

Advertisement