SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधारकांसाठी बॅंकेत नोकरीची संधी..! तब्बल 300 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

बॅंकेतील नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. सारस्वत बॅंकेत पदवीधर तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सारस्वत बॅंकेने नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सारस्वत बॅंकेमध्ये मुंबई आणि पुणे क्षेत्रासाठी ज्युनिअर ऑफिसर पदाच्या ३०० जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरु झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Advertisement

या नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज कसा करायचा, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग व ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

Advertisement

एकूण पदसंख्या – 300 जागा

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
बॅंक, सबसिडी ऑफ बॅंक/ एनबीएफसी/ डीएसए/क्रेडीट सोसायटीतील कामाचा 1 वर्षाचा अनुभव असावा

Advertisement

वयाची अट – 01 डिसेंबर 2021 रोजी 30 वर्षांपर्यंत वय असावे. तसेच उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. त्याच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असावे. स्थानिक उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येईल.

नोकरी ठिकाण – मुंबई व पुणे

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

इथे करा ऑनलाईन अर्जhttps://saraswatbank.com/

Advertisement

जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1V0yFFM76-p_BZbpE4ckwUdihMNhJeIQN/view

निवड कशी होणार..?
बॅंकेच्या नियमांत बसणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रूटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज बाद करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement