SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हाॅटस अ‍ॅप’वर शोधता येणार हाॅटेल नि दुकाने, ‘व्हाॅटस अ‍ॅप’कडून भन्नाट फिचर सादर..!

सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. एखादे दुकान सापडत नसल्यास, तसेच चांगल्या रेस्टाॅरंटमध्ये जाण्याचा विचार असेल, तर त्यासाठी तुम्हाला आता ‘व्हाॅटस अ‍ॅप’ मदत करणार आहे..

‘फेसबुक’च्या मालकीच्या असलेल्या ‘व्हाॅटस अ‍ॅप’ एक नवीन ‘सर्च’ फीचर घेऊन आले आहे.. त्यावर तुमच्या शहरातील जवळची हॉटेल्स, खाण्याची ठिकाणे, रेस्टॉरंट्स, ग्रॉसरीसह कपड्यांच्या दुकानांचीही माहिती मिळणार आहे.. त्यासाठी कोणालाही पत्ता विचारण्याची गरज पडणार नाही..

Advertisement

‘फेसबुक’ आणि ‘इंस्टाग्राम’प्रमाणे ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर कोणत्याही जाहिराती नसतात. मात्र, आता ही कंपनी बिझनेस अ‍ॅपच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी काळात व्हॉट्स अ‍ॅपवरही जाहिराती दिसण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीच्या काळात ‘ऑनलाइन रिटेल’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ‘फेसबुक’ देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर शॉपिंग फीचर अपडेट करीत आहे. ‘फेसबुक शॉपिंग’ त्याचाच एक भाग आहे.

Advertisement

सध्या ब्राझीलमधील ‘साओ पाउलो’ शहरातील लोकांसाठी ‘व्हाॅटस अ‍ॅप’ने हे फीचर लाँच केले आहे. लवकरच ते मोठ्या प्रमाणावर लाँच होणार आहे. त्यानंतर ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ ट्रॅकरद्वारे आवडीची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, किराणा दुकाने शाेधू शकता.

‘बिझनेस निअरबाय’ दिसणार
प्रत्येकासाठी हे फिचर आणले जाईल, तेव्हा व्हाॅटस अ‍ॅपमध्ये ‘बिझनेस निअरबाय’ (Businesses Nearby) नावाचा नवीन सेक्शन दिसेल. त्यावर क्लिक केले की येथे फिल्टरची सुविधा मिळेल. त्यावर आवडीनुसार फिल्टर करून जवळची रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स निवडता येणार आहेत.

Advertisement

‘व्हाॅटस् अ‍ॅप पे’ फिचर सुरु
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हाॅटस् अ‍ॅपने ‘यूपीआय’ फिचर सादर केले होते. ‘व्हाॅटस् अ‍ॅप पे’ (WhatsApp Pay) असे या फीचरचे नाव आहे. त्या माध्यमातून युजर्सला ऑनलाईन व्यवहार करता येत आहेत. मात्र, या फीचरच्या बटणाजवळच चॅटमध्ये मीडिया फाइल्स अपलोड करण्याचेही बटण होते.

अनेकदा समोरच्या व्यक्तीशी चॅट करताना ‘पे’ बटणावरच क्लिक होत होते. त्यामुळे आता हे बटण तेथून काढून दुसरीकडे ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement