SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास मिळते 50 लाखांची भरपाई, असा करा क्लेम..!

स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरला पर्याय नाही.. प्रत्येक घरात आता सिलिंडर पोचला आहे.. मात्र, गॅस सिलिंडरचा वापर करताना मोठी खबरदारी घ्यावी लागते. तुमची छोटीसी चूकही महागात पडू शकते. त्यामुळे गॅस सिलिंडर वापराबाबत वारंवार सूचनाही दिल्या जातात..

एलपीजी गॅस सिलिंडर वापरताना नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, तसेच एखाद्या वेळी मोठी दुर्घटना झाल्यास काय करायला हवे, याबाबत माहिती असणे गरजेचं आहे..

Advertisement

गॅस गळतीमुळे किंवा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास ग्राहक म्हणून तुमचे काय अधिकार आहेत, तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळू शकते, त्यासाठी क्लेम कसा करायचा, याबाबत जाणून घेऊ या…

50 लाखांचा फ्री विमा..
‘एलपीजी’ म्हणजेच घरगुती गॅस कनेक्शनवर पेट्रोलियम कंपन्यांकडून ग्राहकांना ‘पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर’ दिले जाते.. या इन्शुरन्ससाठी पेट्रोलियम कंपन्यांनी विमा कंपन्यांशी भागीदारी केलेली असते. सिलिंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट होऊन अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स मिळू शकतो.

Advertisement

ग्राहकाला डिलिव्हरी करण्यापूर्वी गॅस सिलिंडर व्यवस्थित आहे की नाही, हे तपासून पाहण्याची जबाबदारी डिलरची असते. सिलिंडरमुळे अपघात होऊन जीवित वा वित्तीय हानी झाल्यास कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते. ग्राहकाच्या मालमत्तेचे, घराचे नुकसान झाल्यास 2 लाखांपर्यंत इन्शुरन्स क्लेम करता येतो.

क्लेम कसा कराल..?
– सिलिंडरमुळे अपघात झाल्यास तातडीने त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला, तसेच गॅस वितरकाला द्यावी.
– ही विमा पाॅलिसी ग्राहकाच्या नावे नसते, तर कंपनीने घेतलेली पाॅलिसी प्रत्येक ग्राहकाला कव्हर असते. त्यासाठी ग्राहकाला कोणताही प्रिमीयम भरावा लागत नाही. अपघातात जखमी झालेल्या प्रत्येकाला 10 लाखापर्यंत भरपाई मिळते..

Advertisement

– पोलिस ठाण्यातील ‘एफआयआर’ची काॅपी, दवाखान्याची बिले, मृत्यू झाल्यास पोस्टमाॅर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवावे..

ग्राहकांना अर्ज करावा लागत नाही
गॅस सिलिंडरमुळे झालेल्या अपघाताची तक्रार पोलिसांत केल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याची शहानिशा केली जाते. ‘एलपीजी’ सिलिंडरमुळे अपघात झालेला असल्यास, एलपीजी वितरक एजन्सी किंवा विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयाला त्याची माहिती दिली जाते.

Advertisement

संबंधित कंपनी विमा कंपनीकडे इन्शुरन्ससाठी क्लेम दाखल करते. ग्राहकाला क्लेमचा अर्ज करण्याची किंवा विमा कंपनीशी थेट संपर्क साधण्याची गरज नाही.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement