SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार..! प्रधानमंत्री आवास योजनेत 1 लाखांहून अधिक घरांना मंजुरी..

हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-अर्बन मिशन अंतर्गत आता 1 लाखांहून जास्त घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड अशा 5 राज्यांमध्ये ही घरे बांधली जाणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून (शहरी) एकूण 1 लाख 14 हजार घरे बांधली जाणार आहेत. पैकी 53 लाख घरे बांधून पूर्ण झाली असून, त्यांचे लाभार्थांना वितरण करण्यात आले आहे.

Advertisement

देशातील 5 राज्यांमध्ये ही घरे बांधण्यासाठी 7.52 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.. पैकी आतापर्यंत 1.85 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ही माहिती दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ..

Advertisement

अर्ज कसा करायचा..?
– सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या https://pmaymis.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.
– मेन्यूमध्ये ‘सिटीजन असेसमेन्ट’ (Citizen Assessment)वर क्लिक करा व अप्‍लाय कॅटेगिरी निवडा.
– विविध पर्यायापैकी तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडा.

– नंतर आधार क्रमांक टाकून ‘चेक’वर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाइन फॉर्म समोर येईल. त्यात आवश्यक ती माहिती भरा.
– सगळी माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून व्हेरिफाय करा व सबमिट करा.
– तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक दिसेल. त्याची प्रिंट काढा, तसेच ते सेव्ह करुन ठेवा..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement