SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता प्रत्येकाचं बनणार राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल, पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल..

भारतातील लोक अनेक कोणत्या ना कोणत्या वेबसाईट्स आणि अ‍ॅपमध्ये आपलं प्रोफाईल ओपन करत असतात तेव्हा वेगवेगळे पासवर्ड ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे पासवर्ड ठेवले जातात. मात्र प्रत्येक अ‍ॅप किंवा वेबसाईटवर टाकलेला पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण असतं. आता याला अपवाद फक्त गूगलकडे पासवर्ड सेव्ह केला की तो ऑटो-सेव्ह झाल्याने नंतर आपोआप गरजेवेळी वापरत येतो, पण सुरक्षेचा प्रश्न पुन्हाही येतोच.

सरकारच्या मते, आपण कंप्युटरमध्ये, मोबाईलमध्ये एखादे सिक्रेट फोल्डर करून त्यात आतमध्ये भरपूर जागी वापरात येत असणारे पासवर्ड्स ठेवतो, पण ते कोणाच्या हाती लागणार नाहीत, याची काय गॅरंटी? म्हणून ही समस्या लक्षात घेऊन सरकार सरकारी सेवांसाठी कॉमन पासवर्ड ठेवण्याची योजना आणत आहे.

Advertisement

देशात लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेबासाईटसाठी वेगवेगळे यूजर नेम आणि पासवर्ड ठेवण्याची आवश्यकता नाही. एकाच लॉगिनने सर्व कामे होतील, त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल तयार करण्यात येणार आहे.

आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी कागदपत्रे दाखवण्याची, फॉर्म भरण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी आयडी (ID), पासवर्ड (Password), पॅन (PAN), बँक खाते (Bank Account), टॅन, जीएसटीएन (GSTN), आरटीओ (RTO), विमा क्रमांक (Policy Number) यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता लागणार नाही.

Advertisement

सरकार अशा अनेक सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अ‍ॅप आणणार आहे. या पोर्टलचे नाव ‘सिंगल साइन ऑन’ (Single Sign On) असेल. नॅशनल सिंगल साइन-ऑनवर सर्व नागरिक सेवा केंद्र आणि राज्य सेवा एकत्रित केल्या जातील. यावेळीच UMANG कडे http://www.india.gov.in सोबत नॅशनल सिंगल साइन-ऑन (SSO) मोबाइल अ‍ॅप्लिकेशन राष्ट्रीय सिंगल साइन-ऑन वेबपेजच्या स्वरूपात असणार आहे.

‘नॅशनल डिजिटल प्रोफाइल’मध्ये सर्व सरकारी सेवांचे एकत्रीकरण करून सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. प्रत्येक नागरिकासाठी User Authentication द्वारे लॉगिन सुरक्षित असेल. त्याचबरोबर सर्व शासकीय कामांसाठी प्री फील्ड फॉर्मची योजना सुरू करण्यात येणार आहे. भारत सरकारकडून ऑगस्ट 2022 मध्ये ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने एका दीर्घ सत्राचे आयोजन केले होते. या बैठकीला मंत्री आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement