SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🥃 दारूचं व्यसन लागलंय? मग दारू सोडण्यासाठी करा ‘हे’ फायदेशीर उपाय..

🤔 दारू म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु आपल्या प्राणाहून प्रिय दारू पिणं (Alcohol) हा आजच्या आधुनिक जीवनशैलीचा भाग झाला आहे. पण हीच ददारू घर संसारांची कशी राखरांगोळी हे कित्येकांना माहीत असेल आणि काही व्यक्ती सहन करत असतील तर काही पश्चाताप व्यक्त करत असतील.

🍺 एखाद्या दुसऱ्या वेळेस दारु पिण्यात आली की, त्यानंतर कधी चटक लागेल हे सांगता येत नाही. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहीत असूनही अनेकांना दारू पिण्याचं व्यसन जडतं. याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतो. अशा वेळी दारू सोडण्याचा प्रयत्न केला जातो; पण अनेकांना त्यात यश येत नाही. ज्यांना खरंच दारू सोडायची आहे, अशा व्यक्तींसाठी अमेरिकेतल्या टेक्सासमधील ड्रिफ्टवुड रिकव्हरी या मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्राने काही उपाय सुचवले आहेत.

Advertisement

☕ तुमच्या दैनंदिन, सवयी बदला : दारू पिणं हा अनेकांच्या दिनचर्येचा (Daily Routine) भाग बनलेला असतो. रोज रात्री जेवणानंतर, टीव्ही पाहत असो की किंवा बुद्धीबळ खेळत असो वा पत्ते खेळताना दारू पिण्याची सवय अनेकांना असते. अशावेळी रात्रीच्या जेवणानंतर दारूऐवजी आयुर्वेदिक चहा पिण्याचा प्रयोग करू शकता.

🤞 स्वतःला वचन देणं महत्वाचं : दारू सोडायचा निर्णय हा कुटुंबातील व्यक्तींचा नव्हे तर तुमचा असला पाहिजे. एखादी गोष्ट तडीला न्यायची असेल तर त्यासाठी दृढनिश्चय करणं महत्त्वाचं असतं आणि तो निर्णय घेतला तर पूर्णत्वास नेणे गरजेचं असतं. म्हणून दारू सोडण्याची इच्छा स्वतःची कोणाच्या दबावाशिवाय असावी, असं असेल तर तसा निश्चय करा आणि स्वत:ला एक वचन द्या.

Advertisement

🫂 जवळच्या लोकांची मदत : दारूचे व्यसन सोडायचे असेल, तर अशी इच्छा तुमच्या जवळच्या घरातील व्यक्तींना, मित्र, मैत्रिणींना (Close Person) सांगा. म्हणजे ते तुमची इच्छाशक्ती वाढवतील. मग तुमच्यातली जबाबदारीची भावनाही वाढेल. दारू पिण्याची इच्छा झालीच तर दुसऱ्या कामात तुम्ही स्वतःला गुंतवून घ्या. यात तुम्ही चित्रपट पाहू शकता, फिरायला जाऊ शकता. मन दुसऱ्या गोष्टीत गुंतल्याने दारू पिण्याच्या वेळा हळूहळू कमी होईल.

👨‍⚕ डॉक्टरांकडून सल्ले : दारू पिण्यासाठी काही नियम (Rules) बनवा, म्हणजेच ती रोजच्यापेक्षा कमी पिणे तीपण कशी प्यावी, तर उदाहरणार्थ, दारू एका विशिष्ट वेळी प्या. त्यासाठी एक ग्लास पिण्यासाठी जर 10 मिनीटे लागत असतील तर तुम्ही 45 ते 60 मिनिटं एक ग्लास वाईन प्या. याने तुम्हाला कंटाळा आल्यासारखं होईल आणि पिण्यापासून दूर जाल. दारूमुळे शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होत असते मग दारू प्यायल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जाते.

Advertisement

(दारूचं व्यसन सोडण्याकरता तुम्ही स्वतः निर्णय घ्या, अन्यथा इतर उपाय करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement