SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध लागू, ‘ओमायक्रोन’ला रोखण्यासाठी नियमावली जाहीर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग वाढत आहे.. ओमायक्रोनचा धोका व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून (ता. 24) रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याची घोषणा ठाकरे सरकारने केली..

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संसदिय कार्यमंत्री अनिल परब यांनी ही घोषणा केली. राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या सहीने काढलेल्या आदेशानुसार राज्यात अतिरिक्त निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात 100 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नसल्याचे मंत्री परब यांनी सांगितले.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात कोणते निर्बंध दिले आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

राज्यात असे निर्बंध असतील..
– राज्यात सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत एकत्र येण्यावर बंदी असेल.
– सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम असो वा लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांत एका वेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल. खुल्या जागेत ही संख्या २५० पेक्षा जास्त किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के, यापैकी जे कमी असेल ते.

–  अन्य कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. आसनक्षमता निश्चित नसलेल्या ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.
– क्रीडा स्पर्धा, खेळ समारंभासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

Advertisement

– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या निश्चित करील. असे करताना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन व्हायला हवे.
– उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता, तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल, तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस कल्पना देणे आवश्यक राहील.

Advertisement

निर्बंध प्राथमिक स्वरूपाचे
केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांसाठी ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सांगितले आहे. सध्याचे निर्बंध प्राथमिक स्वरूपाचे असून, ते आताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement