SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😷 राज्यात रात्रीची संचारबंदी? पुन्हा नवे निर्बंध लागू होणार..!

💁🏻‍♂️ महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येण्याचं समजतंय.

⚠️ शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पुन्हा कोरोना कृती दलासोबत व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते.

Advertisement

🔰 केंद्र सरकारने ओमिक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेत राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्सवांवर प्रतिबंध आणण्याचा सल्ला राज्यांना आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

👥 पंतप्रधान मोदींच्या कालच्या बैठकीत राज्यांना या सूचना

Advertisement

▪️ नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा. आवश्यक तेथे किमान 14 दिवस निर्बंध लावावेत.
▪️ टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्यावे. आयसीएमआरने आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.
▪️ हॉस्पिटलमध्ये बेड, अँम्ब्युलन्स आणि आरोग्य उपकरणे वाढविण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवा. तसेच 30 दिवसांच्या औधांचा साठा करावा.
▪️ लोकांना सतत माहिती दिली जावी. अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी राज्यांनी दररोज माहिती द्यावी.
▪️राज्यांनी 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे. सर्व पात्र लोकांना दोन डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी दारोदारी जाऊन अभियान राबवावे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement