SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकरी कर्जमाफीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वपूर्ण घोषणा..!

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापना झाल्यानंतर ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली होती. ‘महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना’ असे या योजनेला नाव देण्यात आले.

भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती. मात्र, नंतर सरकार बदलले. महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची रक्कम 2 लाखापर्यंत वाढविलीच.. शिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय घेतला..

Advertisement

दरम्यानच्या काळात अवघ्या जगावरच कोरोनाचे संकट कोसळले. त्यात महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात होरपळून निघाले.. राज्याची सगळी आर्थिक घडी विस्कटली.. लाॅकडाऊनमुळे तिजाेरीत खडखडाट झाला..

अशा संकटातही ठाकरे सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला, मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्यांचे काय, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता.. कारण, या शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा..
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न समोर आला.. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली.. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणार असल्याची मोठी घोषणाही केली..

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की “नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी योजनेचा काहीही लाभ मिळालेला नाही. मात्र, राज्य सरकार अशा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहे. नियमित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देणार आहोत.”

Advertisement

सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती सुधारणे महत्वाचे आहे. राज्य सरकारची या शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा आहे, पण राज्याची आर्थिक स्थिती तशी नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या घोषणेनंतरही कर्जमाफी योजनेचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी मिळणार, किंवा मिळणार की नाही, हा सवाल कायम आहे. या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement