SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या 15 मिनिटांत फास्ट चार्ज होणार ‘हा’ स्मार्टफोन, कधी लॉंच होणार? वाचा..

स्मार्टफोन कंपनी Xiaomi येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्याच्या तयारीत असून नवीन वर्षात Xiaomi ने भारतातील 2022 साठीचा पहिला लॉन्च इव्हेंट जाहीर केला आहे. पुढील महिन्यात कंपनी भारतात Xiaomi 11i HyperCharge लॉन्च करण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. Xiaomi 11i HyperCharge व्हर्च्युअल पद्धतीने सादर केला जाणार असल्याची माहीती आहे.

Xiaomi 11i HyperCharge लॉन्च करण्याची 6 जानेवारी ठेवण्यात आली आहे. Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीब्रॅंडेड व्हर्जन असल्याचं बोललं जातंय. कंपनीच्या मते, आगामी स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Advertisement

100W पेक्षा अधिक फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. Xiaomi ने या चार्जरला Hypercharge असे नाव दिले आहे. Xiaomi इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, 120W हायपरचार्जर केवळ 15 मिनिटांत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करेल”, असं म्हणाले आहेत.

Xiaomi 11i हायपरचार्जचे स्पेसिफिकेशन्स कसे असू शकतात?

Advertisement

▪️ मिळालेल्या माहीतीनुसार, Xiaomi 11i हायपरचार्ज हा फोन Redmi Note 11 Pro+ चं रीर्ब्रँडेड व्हर्जन असेल आणि त्याच स्पेसिफिकेशन्सशी थोडेशे मिळतेजुळते असण्याची शक्यता आहे. कॅमो ग्रीन आणि स्टेल्थ ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

▪️ Redmi Note 11 Pro+ सारखे Xiaomi 11i हायपरचार्जचे फीचर्स असू शकतात. Xiaomi 11i हायपरचार्जमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले येऊ शकतो.

Advertisement

▪️ होल पंच डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर
असेल, बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलच्या डेप्थ सेन्सरसोबत 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल.

▪️ Xiaomi 11i हायपरचार्ज मध्ये ग्राहकांना 8GB LPDDR4x RAM आणि 128 GB/256GB UFS 3.1 स्टोरेजसह येऊ शकतो. या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्ड सपोर्टद्वारे वाढवता येते.

Advertisement

▪️ बॅटरीबद्दल बोलायचं झालं, तर फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 120W फास्ट चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्ससह जोडलेला आहे.

फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात MediaTek Dimensity 920 चिपसेट, 5G सपोर्ट, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट, JBL स्टीरिओ स्पीकर्स, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या आकर्षक फीचर्ससह आल्यास ग्राहकांसाठी मेजवानीच ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement