SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता स्रियांनी खोटी तक्रार दाखल केली, तर होणार ‘ही’ शिक्षा..

राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारास आळा बसावा, यासाठी असलेल्या ‘शक्ती’ फौजदारी कायद्यात (Shakti Act) सुधारणा करण्यासाठी संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या समितीचा बुधवारी विधानसभेत शक्ती कायद्यासंदर्भातील संयुक्त समितीचा अहवाल सादर केला.

राज्यातील महिलांवरील अत्याचाराविरुद्ध तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी बलात्कार (Rape), अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) आणि समाजमाध्यमातून महिला आणि मुलांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केली आहे. या अहवालानुसार बलात्काराच्या गुन्ह्यास मृत्युदंड तसेच अ‍ॅसिड हल्लेखोराला 15 वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

शक्ती कायद्यानुसार…

काही गुन्ह्यांच्या चौैकशीसाठी पोलिसांना आवश्यक माहिती देण्यास नकार देणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या इंटरनेट किंवा मोबाइल डाटा पुरवठादार कंपन्यांना पूर्वी दंडाच्या शिक्षेची तरतूद 1 महिना आणि 5 लाख अशी होती. आता ती वाढून 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 25 लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

या कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्यांच्या संबंधित चौकशी ही 30 दिवसांच्या आतच पूर्ण होणं आवश्यक आहे, पण समजा ही चौकशी या वेळेत काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही, तर विशेष पोलीस महानिरीक्षक असो किंवा आयुक्त संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती कारणे देऊन ही मुदत आणखी 1 महिना वाढविण्याचा अधिकार दिला गेला आहे.

तरतुदी: जर तक्रारदाराने खोटी तक्रार केल्यास….

Advertisement

शक्ती कायद्यांतर्गत शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणण्यात आले आहे. महिलेच्या विनयभंगाशिवाय फोन अथवा अन्य संदेशवहनाच्या कोणत्याही साधनाद्वारे अश्लील संभाषण करणाऱ्यांना किंवा धमकी देणाऱ्यांना होणाऱ्या शिक्षेत आता पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही समावेश करण्यात आला आहे.

महिलांवर होणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या गुन्ह्यात आजन्म कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, या दंडाच्या रकमेतून महिलेवर प्लास्टिक सर्जरी व अन्य उपचारांचा खर्च करण्यात येईल.

Advertisement

जर तक्रारदाराने खोटी तक्रार केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास तक्रारदार व्यक्तीस कमीत कमी 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास व 1 लाखांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंडदेखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जर समजा लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकणार आहे. त्याचबरोबर राजकीय वा व्यक्तिगत द्वेषातून या कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठीही कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे निर्दोष व्यक्तीच्या अनावश्यक मानहानीला आळाही बसणार असल्याचं वळसे-पाटील यांनी सांगितले. आता यामध्ये काही आवश्यक बदल केल्यावर अंतिम कायद्याचं स्वरुप नेमकं कसं असेल, हे स्पष्ट होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement