SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोज 400 रुपये गुंतवा, एक कोटी मिळवा.. पोस्टाच्या या भन्नाट स्किममध्ये करा गुंतवणूक..!

वृद्धापकाळात आयुष्याच्या उतार वयात हाताशी काही पुंजी असणे आवश्यक असते, नाहीतर हा काळ आणखी कठीण होऊ शकतो.. भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही तरी गुंतवणूक करण्याची प्रत्येकाची इच्छा असते.. मात्र, नेमकी कुठे गुंतवणूक करावी, याबाबत साशंकता असते..

भविष्याची तरतूद करण्यासाठी कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असते. सध्याच्या असुरक्षित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक नि खात्रीशीर परतावा हवा असेल, तर ‘पोस्ट ऑफिस’ (Indian Post) हा एक सुरक्षित पर्याय आहे. पोस्टातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

Advertisement

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या पोस्टाच्या विविध स्किम (Scheme) आहेत. मात्र, पोस्टाची अशी एक योजना आहे, जी फक्त रोजच्या 400 रुपयांच्या बचतीवर चक्क 1 कोटी रुपये देते. या योजनेचे नाव आहे, ‘पीपीएफ’ योजना..! छोट्या गुंतवणुकीत चांगला परतावा देणाऱ्या या योजनेबाबत जाणून घेऊ या..

‘पीपीएफ’ योजनेबाबत…
दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी असल्यास, पोस्टाच्या ‘पीपीएफ’ (PPF) अर्थात ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’मध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरु शकते. या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..

Advertisement
 • योजनेत वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ व्याज मिळते.
 • योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे, परंतु तो आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
 • 15 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला पुढे पैशांची गरज नसल्यास, तुम्ही हा फंड पुढे वाढवू शकता, ज्यावर तुम्हाला अधिक चक्रवाढ लाभ मिळेल.
 • आयकर कायद्यानुसार, ‘पीपीएफ’ खात्यावर कर सवलत मिळते.

दररोज 400 रुपये गुंतवा
पोस्टाच्या या ‘पीपीएफ’ बचत योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये ठेवता येतात. मात्र, एकदम 1.50 लाख रुपये जमा करण्याऐवजी, मासिक 12500 रुपये किंवा रोज 400 रुपये गुंतविल्यास त्यावर मोठा नफा मिळू शकतो.

 • परिपक्वता कालावधी- 15 वर्षे
 • मासिक गुंतवणूक- 12,500 रुपये
 • 1 वर्षाची गुंतवणूक – 1.50 लाख रुपये
 • 15 वर्षांत एकूण गुंतवणूक – 22.50 लाख रुपये
 • वार्षिक व्याजदर – 7.1 टक्के
 • परिपक्वता रक्कम – 40.70 लाख रुपये
 • व्याज लाभ – 18.20 लाख रुपये

योजनेत मासिक 12,500 रुपयांची गुंतवणूक केल्यास, एका वर्षात एकूण 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक होते. 25 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 37.50 लाख रुपये होतील. त्यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिले जाईल. त्यामुळे व्याजाचा लाभ 62.50 लाख रुपये असेल. मॅच्युरिटीनंतर 1.03 कोटी रुपये मिळतील..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement