SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! जनधन अकाऊंटमध्ये पैसे नसतानाही मिळणार 10,000 रुपये, नवीन सुविधा काय? जाणून घ्या..

जर तुमचेही जन धन खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. याशिवाय जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडते. यामध्ये ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, ओव्हरड्राफ्ट सुविधासह अनेक फायदे देखील मिळतात.

10 हजार रुपये कसे मिळवायचे?

Advertisement

▪️ जन धन योजनेंतर्गत, केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत झीरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते. यामध्ये दुर्घटना विमा, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, चेकबुकसह अनेक इतर लाभ सुद्धा मिळतात. (PM JanDhan Yojana)

▪️ ग्राहकांच्या जनधन खात्यात बॅलन्स नसला तरीही, केंद्र सरकारकडून 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा शॉर्ट टर्म लोन सारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

Advertisement

▪️ जनधन खात्यात येणारे हे 10,000 रुपये म्हणजे कमी कालावधीच्या कर्जाप्रमाणे आहे. अगोदर ही रक्कम 5 हजार रुपये होती, आता ती केंद्र सरकारने वाढवून 10 हजार रूपयांपर्यंत केली आहे.

▪️ यासाठी जनधन खात्यात ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान 6 महिने जुने असावे असे नसेल तर तुम्हाला फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध असेल.

Advertisement

▪️अधिक माहीतीसाठी आपण वेबसाईटला भेट देऊ शकता 👉 https://www.pmjdy.gov.in/scheme
या वेबसाईटवर गेल्यानंतर माहीती वाचून जनधन खाते उघडायचे फायदे वाचा आणि सर्वात खाली एक टोल फ्री नंबरही दिला आहे. आपण त्यावर संपर्क करून योजनेंतर्गत कोणतीही माहीती घेऊ शकता.

जनधन खाते कसे उघडायचे?

Advertisement

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र, जर तुम्ही खाजगी बँकेतही जनधन खाते उघडू शकता. समजा जर तुमचे दुसरे कोणत्याही बँकेतील बचत खाते असेल, तर तुम्ही ते जन धन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ती व्यक्ती जन धन खाते उघडू शकते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्र असणाऱ्या आऊटलेटवर उघडले जाऊ शकते. काही ठराविक योगदान देऊन Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY), Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY), Atal Pension Yojana (APY) यांसारखे फायदेही यातून मिळतात.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement