SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलची न्यूझीलंड टीममधून हकालपट्टी, निवड समितीने दिलेय हे कारण…

एजाज पटेल आठवतोय.. हो, हा तोच न्युझीलंडचा बाॅलर आहे, ज्याने भारताविरुद्ध मुंबई येथे झालेल्या टेस्टमध्ये एकाच डावात टीम इंडियाच्या सगळ्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला होता.. अर्थात न्युझीलंड संघाच्या खराब कामगिरीमुळे भारताने ती टेस्ट जिंकली होती…

एकाच डावात 10 विकेट घेऊन एजाज पटेल एका दिवसात दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला.. कारण, असा कारनामा यापूर्वी फक्त इंग्लडचा जीम लिकर व भारताच्या अनिल कुंबळे यांनाच जमलाय..

Advertisement

आता सांगायचा मुद्दा असा, की भारताविरुद्ध इतकी दमदार कामगिरी केल्यावरही या एजाज पटेल याला न्युझीलंडच्या निवड समितीने आगामी बांग्लादेश विरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी बाहेरचा रस्ता दाखवलाय.. त्यावर दिलेले कारणही धक्कादायक आहे…

बांग्लादेशचा संघ जानेवारी महिन्यात न्युझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.. त्यात न्युझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे.. या मालिकेसाठी नुकतीच न्युझीलंड निवड समितीने संघाची घोषणा केली. मात्र, त्यात एजाज पटेल याचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय..

Advertisement

निवड समितीचे म्हणणे काय..?
न्युझीलंड निवड समितीच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदतगार ठरतात. येथील एकूण वातावरणाचा विचार करुन एजाज पटेलला संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागी मॅट हेन्री याची निवड करण्यात आली आहे.

न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड म्हणाले, की ‘एजाझ पटेलने भारताविरुद्ध दमदार कामगिरी करुनही त्याला टीममध्ये जागा नसल्याचे पाहून विचित्र वाटेल. पण, आम्ही नेहमीच परिस्थितीचा विचार करून टीम निवडतो. आमच्या देशात होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये ‘प्लेईंग11′ मध्ये एजाजचा समावेश होणे अवघड होते.’

Advertisement

दरम्यान, या सीरिजमध्ये केन विल्यमसनच्या याच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथम टीमचा कॅप्टन असेल. विल्यमसन मुंबई टेस्टपूर्वी जखमी झाला होता. न्यूझीलंड टीममध्ये डेव्हॉन कॉनवे याचे पुनरागमन झाले आहे. टी-20 वर्ल्ड कप दरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत न्युझीलंडच्या आणखी एका अष्टपैलू खेळाडूने लक्ष वेधून घेतले होते. रचिन रविंद्र, असे त्याचे नाव.. त्याला मात्र न्युझीलंडच्या 13 सदस्यीय संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्याच्या रुपाने न्यूझीलंडकडे फिरकीचा एकमेव पर्याय उपलब्ध असेल..

Advertisement

न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि नील वॅगनर.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement