SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

… तर शाळा पुन्हा बंद करणार..! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे महत्वपूर्ण विधान..

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेले टाळे काही दिवसांपूर्वीच उघडले.. कोरोना संसर्ग कमी झाल्याने विद्यार्थ्यांची पावले पुन्हा शाळेच्या दिशेने पडू लागली.. शाळेचा आवार गजबजून गेला.. आता सगळं काही सुरळीत होईल, असं वाटत असतानाच कुठं तरी माशी शिंकली..

जगभर खळबळ उडविणाऱ्या कोराेनाच्या ‘ओमायक्रोन’ विषाणूने भारतातही आपले पाय पसरले आहेत.. भारतात ओमायक्रोन बाधित रुग्णांची संख्या २१३ वर गेली असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ५४ रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार परत एकदा शाळा बंद करणार असल्याची चर्चा सुरु झालीय..

Advertisement

Advertisement

शिक्षणमंत्री काय म्हणाल्या..?
या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका आज (ता. 22) स्पष्ट केली.. माध्यमांशी बोलताना, मंत्री गायकवाड म्हणाल्या, की “राज्यात ‘ओमायक्रॉन’बाधित रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत गेल्यास, आम्ही पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत..!”

दरम्यान, देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे देशात रोज 14 लाख रूग्ण आढळून येऊ शकतात, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कडक निर्बंधाच्या सूचना केल्या आहेत.

Advertisement

केंद्राच्या राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी (ता. 21) राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. ओमायक्रोन बाधित रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबविण्याच्या शिफारशी त्यात केल्याचे भूषण यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन, आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल, तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे…

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement