SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी जास्त वेळ! आता एक पेपर लिहिण्यासाठी किती वेळ मिळणार? वाचा..

राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या होणाऱ्या परीक्षेसाठी (SSC-HSC Board Exam) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. दरवर्षी तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून मिळणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेत 70 आणि त्यापेक्षा अधिक (70, 80 आणि 100) गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे, तर 70 पेक्षा कमी गुणांच्या (40, 50 आणि 60) गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) सांगितलं आहे.

Advertisement

परीक्षा सुरू होताना सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी अकरा वाजता सुरू होतो. त्यात 70 आणि त्यापेक्षा जास्त गुण असणारे पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. दुपारच्या सत्रातही त्या-त्या पेपरच्या गुणांनुसार वेळ वाढवून दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विद्यार्थी, शाळा आणि पालकांनी हेच वेळापत्रक प्रमाण मानावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच परीक्षेपूर्वी शाळांकडे छापील वेळापत्रक देण्यात येणार असून, त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसावे, असं मंडळाने म्हटले आहे.

Advertisement

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) म्हणाले, “कोरोनाच्या महामारीत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या वेळेपूर्वी कमीत कमी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही”, गोसावी यांनी नमूद केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement