SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🚴‍♀ आता बाजारात आलीय ई-सायकल! फक्त 4 रुपयांतच होतेय फुल्ल चार्ज..?

🔌 जगात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक वाहनांची चलती सुरू झाली आहे. दररोज एक ना एक बातमी ई-व्हेईकलची आपल्या कानी पडत असते. यातच आता कार आणि मोटारसायकलसोबत ई-सायकलची मागणीही वाढली आहे. अशातच व्होल्ट्रॉन मोटर्सने दोन इलेक्ट्रिक सायकल लॉंच केल्या आहेत.

🧐 तुम्ही ई-सायकल घेण्याचा विचार करताय?

Advertisement

👌 ई-सायकलने पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून तर सुटका होईलच, फिटनेससुद्धा राहील. कंपनीने VM50 आणि VM100 नावाने दोन इलेक्ट्रिक सायकल लॉंच केल्या आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्स काळ्या, पिवळ्या, निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध आहेत.

🛒 व्होल्ट्रॉन मोटर्सच्या VM 50 सायकलची किंमत 35 हजार रुपये आहे. तर VM 100 सायकलची किंमत 39,250 रुपये आहे. तुम्ही या इलेक्ट्रिक सायकल्स ऑनलाईन voltron.in.net/pricing-plans/price.html या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता आणि ऑफलाईनही खरेदी करू शकता.

Advertisement

⚡ व्होल्ट्रॉन मोटर्सच्या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्स फक्त 4 रुपये किमतीत पूर्णपणे चार्ज होतात. एका चार्जमध्ये या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्सची रेंज 75 ते 100 किमीपर्यंत आहे. VM50 आणि VM100 इलेक्ट्रिक सायकल्सचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे.

📍 आतापर्यंत बाजारात सर्व इलेक्ट्रिक सायकली सिंगल सीट राइड्स आहेत. पण आता देशातील पहिली डबल राईड ई-सायकल आली आहे. व्होल्ट्रॉन मोटर्सचे सीईओ प्रशांत कुमार यांचा दावा आहे की, त्यांची ही इलेक्ट्रिक सायकल ही देशातील पहिली डबल राइड इलेक्ट्रिक सायकल आहे. आता कार, मोटरसायकल नंतर ई-सायकलची क्रेझ किती आहे, हे बघणे महत्वाचे ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement