देशातील 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षा अखेरीस मोदी सरकारने आनंदाची बातमी दिलीय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) कार्यालयाने नोकरदारांच्या ‘पीएफ’वरील व्याजाचा हप्ता नुकताच त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती देण्यात आली..
२०१९-२० या आर्थिक वर्षात ‘केवायसी’ (KYC) गडबडीमुळे अनेक ‘पीएफ’ खातेधारकांना व्याजाच्या पैशासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती. ‘ईपीएफओ’ने आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ‘पीएफ’वर ८.५ टक्के व्याजदर ठेवला होता, जो गेल्या ७ वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे..
दरम्यान, यावर्षी नोकरदार वर्गाला ‘पीएफ’वरील व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, कोविड संकटामुळे तिजोरीत खडखडाट असल्याने मोदी सरकारने ‘पीएफ’वरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. 2021-22 या आर्थिक वर्षात नोकरदारांना 8.50 टक्के दराने ‘पीएफ’वर व्याज देण्यात आले आहे.
आपल्या ट्विटर हॅण्डलच्या माध्यमातून ‘ईपीएफओ’कडून ही माहिती देण्यात आली आहे. देशातील 23.59 कोटी नोकरदारांच्या खात्यावर ‘पीएफ’वरील व्याजाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे..
असा चेक करा बॅलन्स
तुम्ही ‘इपीएफओ’ नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरुन 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN ENG’ असा मजकुर लिहून ‘एसएमएस’ करावा लागेल. तुम्हाला तुमच्या भाषेतही माहिती मिळेल. त्यासाठी शेवटी ‘ENG’ ऐवजी तुमच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाकावी लागतील. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
‘इपीएफओ’च्या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला बॅलन्स चेक करता येईल. त्यासाठी ‘युएएन’ (UAN) सक्रिय असणे आवश्यक आहे, नाहीतर बॅलन्स दिसणार नाही..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065