SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता विना झंझट देशात कुठेही फिरता येणार..! केंद्र सरकारकडून वाहनांसाठी ‘बीएच सिरीज’ लागू..

नोकरीचे ठिकाण सतत बदलत असणाऱ्या नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. नोकरीनिमित्त अनोळखी शहरात बदली झाल्यावर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, वाहनांचा पासिंग नंबर…

अनेकदा दुसऱ्या राज्यात बदली झाल्यास, गाडीचा पासिंग नंबर बदलण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ते करता करता जिव अगदी मेटाकुटीला येतो.. अशा लोकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिलीय..

Advertisement

कारण, आता गाडीचा पासिंग नंबर बदलण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वाहनांसाठी नवी सिरीज सुरु केली आहे, त्याचे नाव आहे, भारत सिरीज…!

नव्या सिरीजची सुरुवात ‘बीएच’ (BH) अक्षरांपासून होईल. या सिरीजचे वाहन तुमच्याकडे असेल, तर तुम्ही देशभरात कुठेही विना झंझट फिरू शकता. वाहतूक पोलिस तुम्हाला साधे हटकणारही नाही..

Advertisement

याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (ता. 22) संसदेत लेखी निवेदन सादर केले. त्यात म्हटलंय, की नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह-भारत सीरीज (BH) सादर करण्यात आली आहे. या बदलाची अधिसूचना ऑगस्टमध्येच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केली होती.

कोणाला होणार फायदा?
‘बीएच’ सिरीजचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी, तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच, ज्यांची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही ही सिरीज फायद्याची ठरणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले..

Advertisement

‘बीएच सिरीज’चे नियम
मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा दोनच्या पटीत आकारला जाईल. 14 वे वर्ष पूर्ण झाल्यानंतर, मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल, जो त्या वाहनासाठी पूर्वी आकारलेल्या रकमेच्या अर्धा असेल..

दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असेल, तरच ‘बीएच सिरीज’ घेता येणार आहे.. त्यासाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. वाहन डीलरच्या मदतीनेही नोंदणी करू शकतो. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

Advertisement

गाडीचा नंबर कसा असणार..?
बीएच सिरीजच्या गाड्यांचे नंबर ‘YY BH #### XX’ असे असेल.. त्यात प्रथम नोंदणी वर्ष, मग BH हा भारत सीरीजचा कोड असेल. नंतर 0001 ते 9999 पर्यंत क्रमांक असेल, XX मध्ये AA ते ZZ ही अक्षरे असतील.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement