महाराष्ट्र लोकसेवा आयोग.. अर्थात ‘एमपीएससी’मार्फत राज्य शासनात अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरतीकरीता (recruitment) पात्रता स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्या माध्यमातून नोकर भरती केली जाते..
सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘एमपीएससी’च्या (MPSC) माध्यमातून सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी चालून आली आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 साठी 900 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
‘एमपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीत उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा समावेश आहे.
राज्य सरकारमधील विविध विभागांत किती जागांसाठी भरती (Job) होणार आहे, त्यासाठी अर्ज कसा व कुठे करायचा, त्यासाठी अंतिम तारीख काय, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या…
पदे आणि पदसंख्या
उद्योग निरिक्षक (गट क) – 103
दुय्यम निरिक्षक (गट क)- 114
तांत्रिक सहाय्यक (गट क) – 14
कर सहाय्यक (गट क) – 117
लिपिक-टंकलेखक (मराठी) – 473
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) – 79
वरील सर्व पदांसाठी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्वपरीक्षा होणार आहे. तदनंतर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
महत्वाच्या तारखा..
‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर 22 डिसेंबर 2021 पासून 11 जानेवारी 2022 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करता येईल. संयुक्त परीक्षा पूर्वपरीक्षा (गट क) 2021 साठीची परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.
येथे करा अर्ज.. – https://mpsconline.gov.in/candidate
परीक्षा शुल्क
खुला गट– 394 रुपये
राखीव वर्ग – 294 रुपये
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065