SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता आली मायलेजवाली टू-व्हीलर! कमी बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ दोन बाईक्सबद्दल जाणून घ्या..

देशातील अनेक प्रमुख कंपन्यांनी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा कमी बजेटच्या आणि जास्त मायलेजच्या दुचाकी (Bikes) बाजारात आणल्या आहेत. जर पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे तुम्हालाही धाकधूक होत असेल आणि तुम्हीही मायलेज देणारी बाइक शोधत असाल तर, खालील माहीती वाचून तुम्ही ठरवू शकता की या दोन गाड्या केवळ मायलेजच देत नाहीत तर डिझाईन देखील चांगली आहे.

जाणून घ्या त्या 2 बाईक्सबद्दल…

Advertisement

हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) :

देशातील आघडीची कंपनी हिरो एचएफ डिलक्स बाइक ही कंपनीची एक लोकप्रिय बाईक आहे. कंपनीने 5 प्रकारांसह ही बाजारात लॉंच केली आहे. या बाईकचा कसाही वापर केला तरी टिकणारी समजली जाते.

Advertisement

इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचं झालं तर सिंगल सिलेंडर 97.2 सीसी इंजिन आहे. इंजिन 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाईकला 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

बाईकच्या पुढील आणि मागील अशा दोन्ही चाकामध्ये ड्रम ब्रेक्स दिले आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की, ही हिरो एचएफ डिलक्स बाइक 88.24 किमीचे मायलेज देते. बाईकची सुरुवातीची किंमत 52,700 रुपये असून टॉप मॉडेलवर 63,400 रुपयांपर्यंत जाते.

Advertisement

टिव्हीएस स्पोर्ट्स (TVS Sport) :

भारतात टीव्हीएस स्पोर्ट ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मायलेज बाइक आहे. कंपनीने दोन प्रकारांसह लॉंच केली होती.

Advertisement

टीव्हीएस स्पोर्टमध्ये एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित 109.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.29 पीएस पॉवर आणि 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, टीव्हीएस कंपनीनेने या बाईकच्या पुढच्या आणि मागच्या चाकामध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत.

Advertisement

टीव्हीएस स्पोर्ट बाइक प्रति लिटर 70 किलोमीटर मायलेज देते आणि पिकअप साठीही चांगली आहे, असा कंपनीचा दावा आहे. यासोबतच मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. या दोन्ही बाईक्स तुमच्या नजीकच्या शोरूममध्ये उपलब्ध आहेत, आपण या दुचाकींच्या योग्य किंमती समजण्यासाठी तेथे भेट द्या.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement