SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बचपन का प्यार..’ फेसबूकवर राहिले टाॅप ट्रेंडमध्ये, ‘मेटा’कडून वर्षभराचा टाॅप ट्रेडिंग रिपोर्ट सादर..

डिसेंबर महिना सुरु झाला, की सर्वांना चाहूल लागते, नववर्षाची..! नवे वर्षे नवी स्वप्ने, आशा-आकांशा घेऊन येते.. नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना, सरत्या वर्षात काय गमावले नि काय कमावले, याचा धांडोळा घेतला जातो..

वर्षभरातील कामाचा आढावा इतरांप्रमाणेच कंपन्याही घेत असतात.. मेटा (Meta) अर्थात पूर्वाश्रमीच्या फेसबूकनेही (Facebook) असाच मावळत्या वर्षाचा (2021) लेखाजाेखा मांडला आहे.. संबंध वर्षभरात कोणते विषय टाॅप ट्रेंडिंगमध्ये राहिले, याचा रिपोर्ट नुकताच सादर केलाय..

Advertisement

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय नागरिकच नव्हे, तर अख्खे जग कोरोना महामारीशी लढतेय. त्यामुळे साहजिकच हा विषय गेले वर्षभर (2021 मध्ये) ‘फेसबूक’ व ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) वर आरोग्य श्रेणीत टॉपवर आहे. याशिवाय ऑक्सिजन, हॉस्पिटल सारखे की-वर्ड (keyword) ट्रेंडमध्ये राहिल्याचे दिसते..

कोरोनाचे सावट असतानाही जपानमध्ये यंदा ‘टोकियो ऑलिम्पिक’ आयोजित करण्यात आली. त्यात भारताने घवघवीत यशही मिळवले. त्यामुळे हा विषयही ‘फेसबूक’वर यंदा ‘टॉप ट्रेंड’मध्ये राहिलाय.

Advertisement

‘फेसबुक रील’बद्दल बोलायचे झाल्यास, यंदा टॉप ट्रेंडिंग गाण्यांमध्ये ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘राता लांबिया-लंबिया’ या गाण्याने बाजी मारलीय. त्याच वेळी, ‘बचपन का प्यार’ हे गाणेही रिलच्या टॉप ट्रेंडमध्ये समाविष्ट झाल्याचे दिसून येत आहे.

‘फेसबूक’ व ‘इन्स्टाग्राम’वर गेल्या वर्षभरात कोणते विषय ‘टॉप-ट्रेंडिंग’मध्ये राहिले, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

आरोग्य श्रेणी
1. प्रेयर
2. ऑक्सिजन
3. लस, व्हॅक्सिन
4. हॉस्पिटल
5. फ्लेक्स सीड

क्रीडा
1. सुवर्ण पदक (गोल्ड मेडल)
2. टोकियो ऑलिम्पिक
3. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
4. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट
5. पॅराऑलिम्पिक गेम्स

Advertisement

संस्कृती
1. गरबा
2. कॅप्टन विक्रम बत्रा
3. स्वतंत्रता दिवस
4. दागिने (ज्वेलरी)
5. क्रिप्टोकरन्सी

रीलची टॉप गाणी (90 दिवस शोध ट्रेंड)
1. राता लंबिया – शेरशाह
2. Love nwantiti
3. तू मिलता है मुझे – राज बरमन
4. तेरे प्यार में – हिमेश रेशमिया
5. नाम तेरे – Ndee Kundu

Advertisement

रीलचे शीर्ष ट्रेंड
1. राता लंबिया – शेरशाह
2. आयफोन लॉक स्क्रीन (एआर इफेक्ट)
3. बचपन का प्यार
4. बारिश की जाए
5. लुट गए

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement