SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: आता मतदार कार्डला ‘आधार’ लिंक करावं लागणार, पण कसं? वाचा सोपी प्रोसेस..

देशातील मतदारांना मतदानाचा हक्क प्रदान करणारे मतदार ओळखपत्र (Voter-ID) आधार कार्डला जोडण्यासाठीच्या घटना दुरुस्तीच्या विधेयकाला काल (ता.20 डिसें.) सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कायदामंत्री किरण रिजिजू यांनी हे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. या दुरुस्तीमुळे मतदार यादीत नवीन नावाच्या नोंदणीसाठी अर्जदाराला आधार कार्ड जोडणे आवश्यक असणार आहे.

मतदार ओळखपत्रास ‘आधार’ची जोडणी सक्तीची नसल्याचंही सांगण्यात आलं असलं तरी आधार लिंक केल्यास एकच मतदार वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करत असेल किंवा मतदानाचा हक्क बजावत असेल तर अशा बोगस मतदानाला आळा मात्र बसणार आहे, म्हणून मतदार ओळखपत्रास आधार लिंक करण्याचे सरकारने आवाहन केले आहे. या विधेयकामुळे बोगस मतदानाला आळा बसणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

Advertisement

मतदार ओळखपत्राला ‘आधार’ कसं लिंक करायचं?

▪️ आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरून राष्ट्रीय मतदार पोर्टल वेबसाईट म्हणजेच https://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जा.

Advertisement

▪️ मग तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, मतदार ओळख क्रमांक आणि नव्या पासवर्डचा वापर करुन लॉग-इन करा.

▪️ आता तुमच्या स्क्रिनवर नवं पेज उघडलं जाईल. तेथे राज्य, जिल्हा, वैयक्तिक माहिती जसे की तुमचं नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव अशी आवश्यक माहीती भरा.

Advertisement

▪️ तुमची माहीती भरल्यावर Search बटनावर क्लिक करा. तुमची माहिती योग्य असल्यास स्क्रिनवर तशी माहीती दिसेल.

▪️ मग आता फक्त ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा.

Advertisement

▪️ आता पॉप-अप पेज ओपन होताना दिसेल. तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल भरावा लागेल.

▪️ सर्व भरलेली माहीती व्यवस्थित तपासून Submit बटनावर क्लिक करा. तुमची प्रोसेस पूर्ण होईल.

Advertisement

दरम्यान, 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नाव मतदारयादीत समाविष्ट केले जाते, पण ही प्रक्रिया वर्षभरात एकदा जानेवारीमध्ये होत असे. ती आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये केली जाईल. त्यामुळे नव्या मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement