खुशखबर! फ्रेशर्ससाठी ‘ही’ कंपनी नोकऱ्यांचा पाऊस पाडणार, पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय? मग करा अर्ज..
💁🏻♂️ जगात सर्वत्रच कोरोनाच्या संकटात कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे जीव गेले आहेत. ज्यांची नोकरी गेली ते काम मिळविण्यासाठी भटकत आहेत किंवा जे फ्रेशर्स आहेत त्यांना अनेक संधी अनुभव असला तरच मिळत असतात. पण सध्या IT क्षेत्रामध्ये मोठ्या नोकरीच्या भरपूर संधी आहेत. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर जाणून घ्या..
🎓 फ्रेशर्ससाठी TCS कंपनीमध्ये नोकरीच्या संधी..
▪️ BPS चा भाग म्हणून नोकरीच्या संधींसाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवारांचं B.Com पूर्ण असणं आवश्यक आहे.
▪️ अर्ज करण्यासाठी बीए, बीबीए, बीसीएस, बीसीए किंवा इतर संबंधित पदवी अभ्यासक्रम. 2022 मध्ये पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
▪️ इच्छुक उमेदवारांनी tcs.com/careers या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.
▪️ अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी आहे. तर या सर्व उमेदवारांची परीक्षा 26 जानेवारी रोजी होणार आहे.
▪️ अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर ॲप्टिट्युट टेस्ट असेल. लेखी परीक्षेचा कालावधी 60 मिनिटं असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत आणि इतर सर्व परीक्षांना बसता येईल.
▪️ इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी nextstep.tcs.com/campus/#/ या वेबसाईटवर जाऊन आधी प्रोफाईल तयार करा. त्यासोबत लॉग इन आयडी देखील तयार करावं लागेल.
📍 अशा सर्व स्टेप्स फॉलो करून एकेक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामध्ये काही दिवसांचा वेळ जातो म्हणून तुम्ही ही तयारी लवकर करायला हवी. अशा पद्धतीने उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना फोटो आणि तुमची सही असे दोन्ही फोटो देखील अपलोड करावे लागू शकतात. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला वेळ जाणार असून लवकर अर्ज करणं गरजेचं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065