SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकेचा नवा नियम! आता ‘या’ तारखेपासून पैसे जमा करणे आणि काढण्यावर लागणार शुल्क, नियम वाचा..

सध्या 2021 या वर्षातला अखेरचा महिना संपत आला आहे. काही दिवसांनी नवीन वर्ष 2022 सुरू होणार आहे. सर्वसामान्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत नववर्षाच्या स्वागत सुरू आहे. यासोबतच अनेक नियमही बदलणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) ग्राहकांनाही नवीन वर्षात धक्का बसणार आहे.

1 जानेवारीपासून असे अनेक नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खातेदारांना एका मर्यादेपुढे रोख रक्कम काढण्यासाठी आणि कॅश जमा करण्यासाठी चार्ज लागणार आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितल्यानुसार..

तुम्ही सर्व पेमेंट बँक खात्यांमध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट्स ठेवू शकत नाही, मात्र तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडू शकता जिथे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते

Advertisement

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्राहकांना 3 प्रकारची बचत खाते सर्व्हिस देते. या बँकेत इतरही अनेक सुविधा पुरविल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या बेसिक सेव्हिंग खात्यामधून दर महिन्याला तुम्हाला चार वेळा विनाशुल्क पैसे काढता येतात. त्यानंतर पैसे काढण्याचे शुल्क मूल्याच्या 0.50 टक्के असेल आणि किमान 25 रुपये प्रति ट्रान्सझॅक्शन असेल. बेसिंग सेव्हिंग अकाऊंटवर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या बँकेत बचत आणि चालू खात्यांमध्ये एका महिन्यात 10,000 रुपये जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.

Advertisement

मूळ बचत खात्याव्यतिरिक्त इतर बचत खाते आणि चालू खात्यातून दरमहा 25,000 रुपये काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याच वेळी, प्रत्येक वेळी तुम्ही मोफत मर्यादेनंतर पैसे काढाल तेव्हा किमान 25 रुपये आकारले जातील.

IPPB वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकांसाठी असे सर्व नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. म्हणजेच 1 जानेवारीपासून ग्राहकांना झटका बसणार आहे. GST/CESS स्वतंत्रपणे आकारले जाईल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने यापूर्वी 1 ऑगस्ट 2021 रोजी डोअरस्टेप बँकिंग चार्जचे नवीन दर लागू केले होते. या बँकशिवाय इतरही काही बँकांचे नियम बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement