भारतीय जीवन विमा महामंडळ.. अर्थात एलआयसी.. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी.. विमा योजनेच्या माध्यमातून ‘एलआयसी’ (LIC) नागरिकांचे भविष्य सुरक्षित तर करतेच.. पण सुरक्षित गुंतवणुकीची, त्यातून चांगल्या परताव्याचीही हमी देते..
‘एलआयसी’ ही सरकारी कंपनी असल्याने त्यात केलेली गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. ‘एलआयसी’च्या अनेक योजना असल्या, तरी त्यातील काही याेजनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकीच एक आहे, ‘जीवन आनंद योजना’..! ‘एलआयसी’ची ही सर्वाधिक विक्री होणारी विमा पॉलिसी आहे.
तुम्ही कुठे सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, शिवाय आपल्यामागे कुटुंबाचे भविष्यही सुरक्षित व्हावे, असे वाटत असेल, तर या पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.. असे काय आहे या पाॅलिसीत, चला तर मग जाणून घेऊ या…
जीवन आनंद पॉलिसीचे फायदे
– ‘एलआयसी’च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये (Jivan Anand Policy) ‘मॅच्युरिटी बेनिफिट’ मिळते. नॉमिनीचा मृत्यू झाल्यानंतरही लाभ दिला जातो.
– ही एक ‘एन्डॉवमेंट’ (endowment) (लाईफ इश्युरन्स कम सेव्हिंग्ज) योजना आहे. पॉलिसीधारकास गुंतवणूक आणि विमा अशा दोन्ही गोष्टींचा लाभ मिळतो.
– ‘एलआयसी’ची ही पार्टीसीपेटिंग गैर-लिंक्ड पॉलिसी आहे, जे गुंतवणूकदारास संरक्षण आणि बचत प्रदान करते.
कशी कराल गुंतवणूक..?
– जीवन आनंद पॉलिसीमध्ये 5 लाख रुपये ‘लाइफ टाइम’ रिस्क कवर प्रदान केले जाते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर सम अॅश्युअर्डसह रिस्क कव्हरदेखील मिळतो. ही पॉलिसी योजना 15 ते 35 वर्षांच्या मुदतीसह येते.
– किमान 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणीही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतो. त्यासाठी किमान 1 लाख रुपयांची विमा रक्कम असते. याेजनेस कमाल मर्यादा नाही.
64 रुपये गुंतवा, 13 लाख मिळवा..!
‘एलआयसी’च्या या पाॅलिसीबाबत समजून घेऊ या.. समजा, एखाद्याने वयाच्या 35 व्या वर्षी पॉलिसीत गुंतवणूक सुरु केली. त्यासाठी 25 वर्षे मुदतीच्या योजनेसह 5 लाख रुपये सम अॅश्युअर्ड प्लॅन केला, तर त्या व्यक्तीला रोज फक्त 64 रुपये गुंतवावे लागतील.
अशा प्रकारे वयाच्या 60 व्या वर्षी पॉलिसीधारकास 5 लाख रुपये सम अॅश्युअर्ड, 5 लाख 75 हजार रुपये बोनस नि 2 लाख 25 हजार रुपये, अंतिम अतिरिक्त बोनस मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकास 13 लाख रुपये मिळतील.
पॉलिसी सुरु असताना पॉलिसीधारकाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या कुटुंबास 5 लाख रुपयांचा रिस्क कवरही मिळणार आहे.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065