SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुलाबराव पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हेमा मालिनी यांचे कडक उत्तर, कुणी सुरु केला होता या वक्तव्याचा ट्रेंड..?

राज्यातील नगरंपचायतीचा प्रचार शिगेला पोचला असताना, राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.. बोलण्याच्या ओघात नेत्यांकडून अनेकदा जीभ घसरते नि त्यानंतर माफी मागण्याची वेळ या नेत्यांवर येते..

असाच काहीसा प्रकार राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबतीत घडला.. अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी रस्त्यांची तुलना केल्याने गुलाबराव पाटील चांगलेच अडचणीत आले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

Advertisement

अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनाही आपण केलेल्या वक्तव्याची उपरती झाली व त्यांनी तातडीने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.. दरम्यान, हे सगळे प्रकरण काय आहे, गुलाबराव पाटील नेमक काय म्हणाले होते, नि त्यावर हेमा मालिनी यांनी काय उत्तर दिलंय, हे जाणून घेऊ या…

गुलाबराव पाटील काय म्हणाले..?
जळगाव येथे बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रचारसभेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामाची माहिती दिली होती..

Advertisement

ते म्हणाले, की “माझं आव्हान आहे, ३० वर्षे राहिलेल्या आमदारांना, माझ्या धरणगावला या नि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनींच्या गालासारखे केलेत. जर रस्ते तसे नसतील, तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा..!”

Advertisement

हेमा मालिनी यांचे उत्तर..
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना, सुरुवातीलाच हेमा मालिनी हसल्या.. “मला आता माझ्या गालांची अधिक काळजी घेतली पाहिजे..! पण चेष्टेचा भाग सोडा. महिलांबाबत एका जबाबदार व्यक्तीने, मंत्र्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही..!”

“आपल्या गालांबाबत यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून अशा वक्तव्यांचा ट्रेंड सुरू आहे. अनेक जण सहज बोलून जातात. अशाच प्रकारे तेही (गुलाबराव पाटील) बोलले असतील; पण हे अतिशय चुकीचं आहे.”

Advertisement

“सामान्य माणूस बोलत असेल, तर त्याला आपण फार काही करू शकत नाही; पण एखादा बडा नेता, मंत्री असं बोलत असेल, तर ते अजिबात योग्य नाही. कुठल्याही महिलेची तुलना किंवा तिच्या नावाचा उपयोग वक्तव्यांसाठी केला जाऊ नये,” असे हेमा मालिनी म्हणाल्या.

गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी का, या प्रश्नावर हेमा मालिनी म्हणाल्या, की “त्यांनी माफी मागावी, असं अपल्याला वाटत नाही, कारण अशी वक्तव्ये आपण फारशी गांभीर्याने घेत नाही..!”

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement