राज्यात गेल्या 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली होती. मात्र, त्यानंतरही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत..
दरम्यान, एसटी संपाबाबत आता आणखी एक महत्वाची बातमी समोर येतेय.. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.. दुसरीकडे कर्मचारी मात्र मागण्यांवर ठाम असल्याने संपात फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे..
माध्यमांशी बोलताना गुजर म्हणाले, की “महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर रोजी दिलेल्या नोटीसीनुसार 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. हा संप 54 दिवस सुरु होता. आतापर्यंत 2 ते 3 वेळा परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठका झाल्या.”
ते म्हणाले, की “ज्येष्ठ नेते शरद हवार यांच्यासोबत नवी दिल्लीत प्रदीर्घ चर्चा झाली. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, आता हा लढा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीला 20 जानेवारी 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे. समितीचा निर्णय सरकार व आम्हाला मान्य असेल.”
संघटनेने पुकारलेला लढा आता थांबवत आहोत. कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे 22 डिसेंबरपर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन अजय गुजर यांनी केले आहे…
कर्मचारी संपावर ठाम..
अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप नसून, आमच्यासाठी दुखवटा आहे. हे आंदोलन कोणत्याही संघटनेचे नाही. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे..
अजय गुजर कोण, आम्हाला माहीत नाही. आमचा पाठिंबा अॅड. गुणरत्न सदावर्तेंना आहे.. आमच्या मागण्या मान्य करून घेण्याचा अधिकार अजय गुजर यांना कुणी दिला? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय.
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले..?
एसटी संपातून यापूर्वी 28 युनियननी माघार घेतली, तरी दुखवट्याला काहीही फरक पडला नाही, ही 29 वी युनियन आहे. या युनियनमध्ये माणसे नाहीत. राज्यात 250 ठिकाणी आंदोलन सुरु आहे.. दोन लोक गेल्याने दुखवट्याला फरक पडत नाही. गुजर यांनी जिकडे जायचे तिकडे जावे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065