SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अपघात होण्यापूर्वीच समजणार पुढील धोका, मोदी सरकारकडून खास अ‍ॅप लाॅंच..!

जगात जेवढे अपघात होतात, त्याच्या 6 टक्के अपघात भारतात होतात नि त्यात मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्याही जगाच्या तुलनेत दहा पटीने जास्त आहे. जगाच्या तुलनेत भारतात वाहनांची संख्या कमी असतानाही अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीतून दिसते..

ही बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार रस्त्यावर लोकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करीत असतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) आयआयटी, मद्रास नि डिजिटल टेक कंपनी (MapmyIndia) सोबत रस्ता सुरक्षा तंत्रज्ञानासाठी सहकार्य केलंय.

Advertisement

रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी मोदी सरकारने नुकतेच एक नेव्हिगेशन अ‍ॅप लाॅंच केले.. नागरिकांना त्याचा अगदी मोफत वापर करता येणार आहे.. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना रस्त्यावरील अपघातांच्या धोक्यांबद्दल सतर्क केले जाणार आहे. शिवाय इतरही अनेक फिचर्स त्यामध्ये आहेत.

अ‍ॅपचा काय उपयोग..?
रस्त्याने प्रवास करताना चालकांना या अ‍ॅपमुळे अपघातप्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणे नि खड्ड्यांची माहिती मिळणार आहे.. इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देण्याचे काम हे अ‍ॅप करील. रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे..

Advertisement

मॅप माय इंडियाने (MapmyIndia) विकसित केलेल्‍या ‘मुव्ह’ (MOVE) नावाच्या या नेव्हिगेशन सेवा अ‍ॅपने 2020 मध्ये केंद्र सरकारचे ‘आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज’ जिंकले होते. आयआयटी, मद्रास नि मॅप माय इंडियाद्वारे डेटाचं विश्लेषण केलं जातं. रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठीही सरकार हे अ‍ॅप वापरु शकते.

आयआयटी, मद्रास येथील संशोधकांनी जागतिक बँकेच्या निधीतून तयार केलेले हे रस्ता सुरक्षा मॉडेल रस्ते मंत्रालयाने स्वीकारलं आहे. देशाताली रस्ते सुरक्षित करण्यासाठी नि आपत्कालीन परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या विकसित इंटिग्रेटेड रोड अपघात डेटाबेस (IRAD) मॉडेलचा वापर केला जाणार आहे.

Advertisement

भारतात 2030 पर्यंत रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी या अ‍ॅपचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येते.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement