SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’च्या अभ्यासाचे टेन्शन आलंय…? मग ही साधने वापरा, होईल मोठा फायदा..!

एमपीएससी.. अर्थात स्पर्धा परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहाने अभ्यासाला लागले आहेत.. एमपीएसीची तयारी करताना चालू घडामोडींवर विशेष भर द्यावा लागतो. चालू घडामोडींच्या अभ्यासाची व्याप्ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर विस्तारलेली आहे.

‘चालू घडामोडी’ हा विषय पक्का करण्यासाठी परीक्षेच्या (MPSC) दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

इंटरनेट (Internet)
चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यासाठी यू-ट्यूबवर प्रत्येक विषयावरील व्हिडिओ उपलब्ध आहेत. गुगलवर विविध गोष्टी सर्च करून तुम्ही माहिती मिळवू शकता. शिवाय येथे अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जेथे चालू घडामोडीबाबत वाचायला मिळेल.

वृत्तपत्र (Newspaper)
प्रत्येक बातमी, लेख सखोलपणे वाचण्याऐवजी फक्त प्राथमिक माहिती ठेवावी. त्यात बातमीचा आधार, प्रत्यक्ष काय घडले, त्यामागील कारण आणि त्यावर तुमचे मत, याचा समावेश असावा.

Advertisement

टेलिव्हिजन (TV)
टीव्हीवर चित्रपट, मालिका पाहण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी कोणत्याही बातम्या पाहू शकता, त्यातून देशात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळेल व ती भविष्यात उपयोगी पडू शकते.

मोबाईल अॅप (Mobile app)
मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर करंट अफेयर्सबाबत अनेक अॅप आहे. त्यापैकी चांगले रेटिंग असणारे अॅप इन्स्टॉल करा. त्यावर चालू घडामोडींवरील प्रश्न मिळतील, तसेच तुम्ही त्यावर मॉक टेस्टही घेऊ शकता.

Advertisement

मासिके (Magzin)
मासिकांमधूनही बरीच माहिती मिळते. विशेषत: चालू घडामोडींवर अशी काही मासिके प्रकाशित होतात. अशा काही उपयुक्त मासिकातून गेल्या काही महिन्यांची विशेष माहिती मिळवू शकतो.

नोट्स (Notes)
तुम्ही स्वत: नोट्स किंवा ई-नोट्स तयार करू शकता. काही वाचल्यानंतर ते परत लिहिल्यास ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते. नोट्सच्या स्वरूपात चालू घडामोडी मांडल्यास, त्याची उजळणी करायला सोपे जाते.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement