SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गौतम गंभीरची आयपीएलमध्ये पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री; या टीमसाठी बजावणार मोठी भूमिका..

क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे… बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला व राजकारणात स्थिरावलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे..

आयपीएल (IPL)मधील कोलकता नाईट रायडर्स संघाला गंभीरने दोन वेळा चॅम्पियन बनविले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या लखनऊ संघाने गंभीरवर मोठी जबाबदारी सोपवल्याचे वृत्त समोर आले आहे..

Advertisement

आयपीएल-२०२२मध्ये लखनऊ व अहमदाबाद फ्रँचायझी सामील होणार असून, त्यामुळे संघांची संख्या १० वर गेली आहे.. या संघाची नावे अद्याप निश्चित झालेली नसली, तरी लखनऊ फ्रँचायझीचा मेंटॉर (मार्गदर्शक) म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएल-२०२२ मध्ये तो लखनऊ संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. आयपीएल इतिहासातील लखनऊ ही सर्वात महागडी टीम ठरली आहे. आरपीएसजी ग्रुपने (RPSG) तब्बल 7090 कोटींना ही टीम खरेदी केली होती.

Advertisement

गौतम गंभीरची प्रतिक्रिया..
लखनऊ संघाच्या मेन्टाॅर झाल्यानंतर गंभीरने ट्विटरवर म्हटलंय की ”पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होणे, हा माझ्यासाठी बहुमान आहे. लखनऊ टीमचा मेंन्टॉर केल्याबद्दल डॉ. संजीव गोयंका यांचे आभार.. माझ्या हृदयात विजयाची आग कायम आहे. मी ड्रेसिंग रूमसाठी नाही, तर उत्तर प्रदेशसाठी संघर्ष करेल..”

Advertisement

‘आरपीएसजी’ कुटुंबात स्वागत करताना, फ्रेंचायझीचे मालक संजीव गोयंका म्हणाले, की “गौतमची कारकीर्द चांगली राहिलीय. मी त्याच्या क्रिकेट अनुभवांचा आदर करतो नि त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

मुख्य प्रशिक्षकपदी अँडी फ्लॉवर
लखनऊ टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी झिम्बाब्वेचे माजी कॅप्टन अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते पंजाब किंग्ज टीमचे सहायक प्रशिक्षक होते.. टीम इंडियाचे माजी विकेट किपर विजय दहिया असिस्टंट कोच असतील. दहिया सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट टीमचे हेड कोच आहेत.

Advertisement

दरम्यान, खेळाडू म्हणून गौतम गंभीरची कारकिर्द शानदार राहिली होती. आता तो नव्या मेन्टाॅरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता त्याची कामगिरी कशी राहते, त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम लखनऊ आयपीएलमध्ये कुठवर मजल मारतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement