SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बीडमध्ये पेटलंय कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध..! पिल्लाला मारल्याचा ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं..!

किरकोळ वादातून एखाद्याचा बदला घेण्याची भावना माणसांमध्ये दिसून येते.. आपल्या विरोधकाचा काटा काढण्यासाठी मग ही माणसे कोणत्याही थराला जायला मागे-पुढे पाहत नाही.. मात्र, ही बदल्याची भावना फक्त माणसातच असते, असे नाही.. तर प्राण्यांमध्येही असल्याचे पाहायला मिळते..

भावना दुखावल्या गेल्यास प्राणीही आपल्या विरोधकांचा बदला घेण्यासाठी वाट्टेल ते करतात. असाच एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात घडला आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवुळ गावात गेल्या महिनाभरापासून एक धक्कादायक प्रकार सुरु आहे.. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या झुंडीनं माकडाच्या एका पिल्लावर हल्ला करीत त्याचा जीव घेतला. त्यातून माकडांनीही बदला घेण्यास सुरुवात केली..

गावातील कुत्र्यांचा काटा काढण्यासाठी माकडांच्या झुंडीच्या झुंडी गावात शिरतात.. कुत्र्यांच्या पिल्लांना उचलून उंच इमारती किंवा झाडांवर घेऊन जातात व खाली जोरात फेकून देतात. आतापर्यंत अशा प्रकारे त्यांनी तब्बल 250 कुत्र्यांचा जीव घेतलाय.

Advertisement

माकडांकडून मुलांनाही लक्ष्य
कुत्र्यांचा बदला घेण्यासाठी माकडांनी हा खेळ सुरु केला होता. मात्र, आता या माकडांनी लवूळ गावातील लहान मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे माकडांच्या या त्रासाला गावकरी वैतागले असून, त्यांना आपल्या लहान मुलांची काळजी लागली आहे…

याबाबत गावकऱ्यांनी वन विभागाकडेही तक्रार केली होती. मात्र, वन विभागाने अजून तरी या प्रकरणात लक्ष घातले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे..

Advertisement

माकडांच्या गँगने गावातील 8 वर्षीय मुलावरही हल्ला चढवला होता. मात्र, गावकऱ्यांनी दगड मारून माकडांना पळवून लावल्याने मुलाचे प्राण वाचले. कुत्र्यांच्या पिल्लांना वाचवण्यासाठीही गावकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, उलट त्यात लोकांनाच दुखापत झाल्याचे सांगण्यात येते..

‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून दखल
माकडांच्या गॅंगमुळे आता गावात नावालाही कुत्रे वा कुत्र्याचे पिल्लू दिसत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अगदी आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या घटनेची दखल घेतलीय.. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘सॅमबॅड इंग्लिश’ सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालेय.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement