प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना.. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 9 हप्ते मिळाले असून, लवकरच या योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे…
शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 डिसेंबरलाच हप्त्याचे पैसे येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तशा बातम्याही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर 16 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली..
शेतकऱ्यांना 16 डिसेंबरला 10 वा हप्ता यायला सुरुवात होईल, अशी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले असले, तरी हा कार्यक्रम नैसर्गिक शेतीबाबत होता.. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला..
पीएम किसान सन्मान निधीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. हा हप्ता कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असताना, आता 25 डिसेंबरपर्यंत हा हप्ता येणार असल्याचे सांगण्यात येते.. अर्थात केंद्र सरकारकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही..
कशामुळे होताेय उशीर..?
निधी हस्तांतरण आदेश तयार नाही
पीएम किसान सन्मान निधीला उशीर होण्यामागे काही कारणे समोर आली आहेत.. त्यात राज्यांनी 10व्या हप्त्यासाठी निधी हस्तांतरण (RFT) वर स्वाक्षरी केली असली, तरी अद्याप निधी हस्तांतरण आदेश तयार झालेला नाही.
हा निधी हस्तांतरण आदेश तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या फक्त ‘आरएफटी’ (RFT) दिसत आहे.. म्हणजेच राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या डेटाची पडताळणी केली आहे. फक्त निधी हस्तांतर होणे बाकी आहे..
शेतकऱ्यांनो, ‘ई- केवायसी’ केलंय का..?
मोदी सरकारने डिसेंबर महिन्यात पीएम किसान योजनेत 5 बदल केले होते. त्यानंतर नुकताच 6वा बदल केलाय. त्यानुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ (e-KYC) करावी लागणार आहे. ई-केवायसी केलेले नसल्यास याेजनेचा पुढील हप्ता अडकण्याची शक्यता आहे.
ई-केवायसीबाबत माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065