SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी शास्रज्ञाने कोर्टात घडविला बाॅम्बस्फोट..! दिल्ली पोलिसांना लावला डोक्याला हात..!

एखाद्याचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटलेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो… समाजासाठी अशी व्यक्ती फारच धोकेदायक असतात. विशेष म्हणजे, अशी व्यक्ती रागाच्या भरात स्वत:चे, कुटुंबाचेही नुकसान करुन घेत असते..!

असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय.. किरकोळ वादातून शेजाऱ्याचा काटा काढण्यासाठी एकाने थेट बाॅम्बस्फोटच घडवून आणला.. विशेष म्हणजे, आरोपी व्यक्ती शास्रज्ञ आहे, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही.. हा नेमका काय प्रकार आहे, चला तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमका प्रकार काय..?
दिल्लीतील रोहिणी जिल्हा न्यायालयाच्या कोर्ट रूम नंबर १०२ मध्ये ९ डिसेंबर रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. हा कमी तिव्रतेचा स्फोट होता. मात्र, त्यात एक जण जखमी झाला. थेट कोर्टात बाॅम्बस्फोट झाल्याने दिल्लीची पोलिस यंत्रणा चांगलीच हादरली होती.

रोहिणी कोर्टातील या बॉम्बस्फोटामागे कोणत्या तरी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता.. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासही सुरु केला.. मात्र, कसून शोध घेतल्यावरही या घटनेत दहशतवाद्यांचा हात असल्याचे धागेदोरे हाती लागले नाही..

Advertisement

पोलिसांनी तपासाची दिशा बदलल्यानंतर मात्र धक्कादायक गोष्ट समोर आली. चक्क एका शास्रज्ञानेच हा बाॅम्बस्फोट घडवून आणल्याचे तपासात समोर आले.. भूषण कटारिया (वय 47) असे या शास्रज्ञाचे नाव आहे.. कटारिया याला अटक करुन त्याची कसून चौकशी करण्यात आली..

कटारिया याने दिलेली माहिती ऐकल्यावर पोलिसांनाही डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली. एका किरकोळ वादातून हे कांड केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले..

Advertisement

आरोपी ‘डीआरडीओ’मध्ये वरिष्ठ शास्रज्ञ
आरोपी भूषण कटारिया हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) येथे वरिष्ठ शास्रज्ञ म्हणून सेवेत होता. मात्र, तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या वकिलाशी त्याचे भांडण होते.

शेजारी राहणाऱ्या वकिलाचा काटा काढण्यासाठी त्याने प्लान तयार केला. त्यानुसार तो वकिलाच्या वेशात कोर्ट रूममध्ये गेला.. तेथे त्याने टिफीन बाॅक्समध्ये नेलेला बॉम्ब प्लांन्ट केला व तेथून तो बाहेर पडला. नंतर रिमोट कंट्रोलने त्याने बाॅम्बस्फोट घडवून आणल्याने तपासात स्पष्ट झाले आहे..

Advertisement

घटनेच्या दिवशी 9 डिसेंबरला सकाळी ९.३३ वाजता आरोपी कटारिया हातात दोन बॅग घेऊन कोर्ट रूमध्ये गेला. नंतर तासाभराने म्हणजे १० वाजून ३५ मिनिटांनी दोन्ही बॅग तिथेच सोडून तो बाहेर पडला व नंतर स्फोट घडवून आणल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश आस्थाना यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून आरोपी शास्रज्ञ व संबंधित वकिलात वाद सुरु होता. त्यामुळे त्यांनी याआधीही परस्परांविरोधात स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये अनेकदा तक्रारी दिल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement