SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आत्महत्येची पुनरावृत्ती! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाच्या आत्महत्याने राज्यात खळबळ, सुसाईड नोटमध्ये काय?

राज्यात Swapnil Lonkar suicide या विद्यार्थ्याने जुलै 2021 मध्ये नैराश्यातून आत्महत्या केली होती. या युवकाचे आत्महत्या प्रकरण निवळले नसताना आता दुसरीकडे पुण्याच्या दौंड तालुक्यात अशाच घटनेची पुनरावृत्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक घटनेविषयी सविस्तर…

Advertisement

मल्हारी बारवकर (रा. देऊळगाव गाडा, ता.दौंड, जि.पुणे) या 25 वर्षीय मल्हारी नामदेव बारवकर या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारी बारवकर हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करत होता. त्याने या आधी 3 ते 4 पेपर देखील दिले आहेत. आता मल्हारीची येत्या 2 जानेवारीला पूर्व परीक्षा होणार होती. मात्र नेहमीच परीक्षा पुढे ढकलत चालली असल्याने हताश झाला होता.

Advertisement

त्याच्या वडिलांनी परीक्षा सरावासाठी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी जमीन विकून पैशांची तजवीज केली होती. वडिलांची अपेक्षा पूर्ण न केल्याने काल शुक्रवार दि.17 रोजी सायंकाळच्या चार वाजेच्या जवळपास राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. मल्हारी हा त्यांना एकुलता एक मुलगा होता तर बहीण ही विवाहित असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

मल्हारी हा गेली तीन वर्ष पुण्यातील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करत होता. स्थानिकांच्या माहितीनुसार शाळेत तो हुशार होता. त्याचे वडिल नामदेव बारवकर हे सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली म्हणून काम करतात. मल्हारीच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मोठा खर्चही त्याच्या आईवडीलांनी केला होता. मात्र कोविडमुळे सतत परीक्षा पुढे ढकलत गेल्या आणि तो खचत चालला होता.

Advertisement

सुसाईड नोट तपासात सापडली..!

Advertisement

मल्हारी बारवकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठीमध्ये त्याने मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही. तुमचे पडालेले चेहरेही मी पाहु शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यतही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगल्या जगण्याच्या आशा संपल्या आहेत, सॉरी!,” असे त्याने लिहून ठेवले आहे. तरी नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement