SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतात एकाच नंबरहून दर तासाला 27 हजार स्पॅम कॉल.. ‘ट्रू कॉलर’च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी उघड

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय.. त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आता समोर येताना दिसत आहेत. स्मार्टफोनचे काहींनी अगदी व्यसन लागलेय, तर सायबर चोरांनी याच मोबाईलच्या साहाय्याने नागरिकांना लुटण्याचा धंदा सुरु केलाय..

फोनचे महत्वाचे काम म्हणजे, एकमेकांशी संवाद साधता येणे.. दिवसभरात अनेक काॅल होतात.. काही कामाचे असतात.. तर कधी कधी फेक काॅलही येतात.. राॅंग नंबर बोलून आपण ते कट करतो.. मात्र, काहींना हाच एक धंदा लागला आहे..

Advertisement

ओळख असो वा नसो त्यांचे काॅल सुरु असतात.. त्यातून समोरची व्यक्ती वैतागून जाते.. कधी असे नंबर ब्लाॅक करते, तर कधी फारच त्रास झाल्यात सायबर पोलिसांत तक्रार करते. विशेषत: महिला, मुलींना असे काॅल येण्याचे प्रमाण मोठे आहे..

अशा काॅलला ‘स्पॅम’ कॉल म्हणून ओळखले जाते.. अशा काॅलच्या माध्यमातून अनेकदा काही लोकांची फसवणूक (Fraud) झाल्याचेही समोर आलेय. ट्रू कॉलर (Truecaller) अॅपमुळे असे काॅल ओळखणे सोपे झाले आहे..

Advertisement

प्रत्येक कॉलचे लोकेशन, कोणाच्या नंबरहून कॉल आलेय त्याचे नाव व इतर डेटा रेकॉर्ड करण्याचे काम ‘ट्रू कॉलर’ करते.. ट्रू कॉलरने नुकताच या वर्षाचा ‘ग्लोबल स्पॅम रिपोर्ट’ (Global Spam Report) जाहीर केला. त्यात जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी दिली आहे.

भारतात 20 कोटी ‘स्पॅम कॉल’
ट्रू कॉलरने ‘स्पॅम’ कॉल्सबाबत दिलेली ही माहिती धक्कादायक आहे. एका स्पॅमरने एकाच नंबरहून या वर्षात भारतात तब्बल 202 दशलक्ष (20 कोटी) ‘स्पॅम कॉल’ केले. रोजचा विचार केल्यास सुमारे 6 लाख 64 हजार, तर प्रत्येक तासाचा विचार केल्यास, या स्पॅमरने एकाच नंबरहून 27 हजार लोकांना स्पॅम कॉल करून लोकांना त्रास दिल्याचे समोर आलेय.

Advertisement

विशेष म्हणजे, रिपोर्टमधील हा डेटा फक्त जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतचाच आहे. भारतात दर महिन्याला प्रत्येकाला किमान 16 पेक्षा जास्त स्पॅम कॉल येतात. मात्र, या वर्षी भारतातील स्पॅम कॉल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.

भारत चौथा स्थानी
ट्रू कॉलरच्या टॉप-20 स्पॅम काॅलच्या यादीत भारत चौथा स्थानावर आलाय. गेल्या वर्षी भारता नवव्या स्थानी होता. त्यातही सर्वाधिक कॉल टेलीमार्केटिंग व फायनान्शियल सर्व्हिसेसचे असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलेय..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement