जगात एकमेकांशी संपर्क करण्याची माध्यमे जरी खूप असली, तरी ते शक्य फक्त इंटरनेटमुळे झाले हे तुम्हाला माहीतच असेल. मात्र, इंटरनेटच्या आधी एकमेकांशी संपर्क करण्याची माध्यमे नव्हती. काही वर्षांपूर्वीच ती हळूहळू अस्तित्वात आली.
कालांतराने, जगामध्ये फिचर फोन, मोबाईल आला आणि जग बदलायला सुरुवात झाली. कॉल आणि टेक्स्ट मेसेज करून लोक एकमेकांच्या संपर्कात राहू लागली. पण तुम्हाला माहीती आहे का, जगातील पहिला मेसेज कोणी कधी पाठवला? जाणून घ्या..
जगात पहिला टेक्स्ट मेसेज म्हणजेच SMS चा लिलाव
जगात पहिला टेक्स्ट मेसेज म्हणजेच एसएमएस (SMS)चा लिलाव करण्यात येणार असल्याचं कळतंय. जगातील हा पहिला टेक्स्ट मेसेज (SMS) 1992 साली पाठवण्यात आला होता, अशी माहीती आहे. प्राप्त माहीतीनुसार, हा मेसेज एका व्होडाफोन कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता.
मेसेजविषयी अधिक माहीती अशी की, जगातील पहिला एसएमएस ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ (Neil Papworth) यांनी 29 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी पाठवला होता. या मेसेजमध्ये ‘मेरी ख्रिसमस’ असा छोटा संदेश लिहिण्यात आला होता. एसएमएसच्या या मोठ्या लिलावात या मेसेजसाठी 170,000 डॉलर्सच्या जवळपास (जवळपास 1 कोटी 71 लाख रुपये) किंमत मिळू शकते.
आता मोबाईल सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी व्होडाफोनने (Vodafone) या एसएमएसचा लिलाव करण्याचा ठरवलं आहे. या एसएमएसच्या डिजिटल प्रतीचा पॅरिसमधील अगुटेस ऑक्शन हाऊस (Paris auction house Aguttes) येथे लिलाव केला जाईल. हा लिलाव 21 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे.
जेव्हा 1992 मध्ये हा एसएमएस पाठवण्यात आला होता. तेव्हा तो प्रचंड लोकप्रिय होईल, असं कुणाला वाटलंही नसेल आणि तसं पाहिलं तर ही कुतुहलाचीच बाब म्हणावी लागेल. तर या लिलावातून जी काही रक्कम मिळेल ती यूएनएचसीआर- यूएन रिफ्यूजी एजन्सीला दिली जाणार असल्याचे व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या गोष्टीला आपण डिजिटल क्रांतीची साक्षीदारही म्हणू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065