SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाॅलिवुडमधील हिरोईन्स ईडीच्या रडारवर..! 200 कोटींच्या खंडणीतील आरोपीचे धक्कादायक खुलासे..!

एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर याला पोलिसांनी अटक केली होती.. मात्र, नंतर या सुकेशचे बाॅलिवुडशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आले..

बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही यांनी या सुकेशने कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे पोलिस तपासात समोर आले.. त्यामुळे ‘ईडी’ने आरोपी सुकेश याची चांगलीच कसून चौकशी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत…

Advertisement

जॅकलीन व नोरासह या सुकेशचे बॉलिवूडमधील आणखी काही बड्या अभिनेत्रींशीही कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीय. तिहार जेलमध्ये तब्बल 12 अभिनेत्रींना भेटल्याची, तसेच जेल कर्मचाऱ्यांना महिन्याला तब्बल 1 कोटी रुपये लाच देत असल्याची धक्कादायक माहिती त्याने दिल्याचे समजते.

बड्या अभिनेत्री रडारवर..
सुकेशने ईडीला दिलेल्या जबाबात जॅकलीन, नोरा फतेही यांच्यासह शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर यांच्यासह काही अभिनेत्रींची नावे घेतल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ईडीच्या रडारावर काही बड्या अभिनेत्री येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

ईडीच्या चौकशीदरम्यान, सुकेशने तो 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखत असून, ड्रग्ज केसमध्ये श्रद्धाची मदत केल्याचे सांगितले.. हरमन बावेजा जुना मित्र असल्याचे त्याने सांगितले. तसेच राज कुंद्राच्या केसमध्ये शिल्पा शेट्टीशीही संपर्क आल्याची माहिती त्याने ‘ईडी’ला दिल्याचे समजते.

जॅकलीनसोबत प्रेमप्रकरणाचा दावा
सुकेशच्या या दाव्यामुळे श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी व हरमन बावेजा आता ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. सुकेश व जॅकलीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलीनसोबत प्रेमप्रकरण असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, जॅकलीनने ते नाकारले आहे.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement