SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’साठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने सगळ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या परीक्षा न झाल्याने अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली होती. त्यांच्यासाठी एकप्रकारे शासकीय सेवेची दारे बंद झाल्याचे दिसत होते..

दरवर्षी महाराष्ट्रात सुमारे 18 ते 20 लाख उमेदवार ‘एमपीएससी’ची परीक्षा देतात. मात्र, विविध खात्यांमध्ये 4-5 हजार पदे भरली जातात.. सुरुवातीला मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने व नंतर कोरोनाचे संकट आल्याने ‘एमपीएससी’च्या परीक्षा झाल्या नव्हत्या.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.. अशा उमेदवारांसाठी ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी परवानगी दिली असून, तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

एक वेळची विशेष बाब
1 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिध्द होणाऱ्या जाहिरांतीसाठी ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे..

Advertisement

कोविडमुळे गेल्या 2 वर्षांपासून ‘एमपीएससी’ आणि सरळसेवेची भरती प्रक्रिया झालेली नाही.. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली होती.. या विद्यार्थ्यांकडून वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी होत होती. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यास मान्यता दिली..

अंदाजित तारखा जाहीर
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेसाठी अंदाजित तारखा जाहीर केल्या आहेत. ‘एमपीएससी-2021’ साठी राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement