SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 16 डिसेंबर 2021

मेष (Aries) : काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी.

Advertisement

वृषभ (Taurus) : अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल.

मिथुन (Gemini): सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात.

Advertisement

कर्क (Cancer) : जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागेल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.

सिंह (Leo) : आज संपूर्ण शुभफल देणारा दिवस आहे. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल.

Advertisement

कन्या (Virgo): आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता.

तूळ (Libra) : अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग. आप्तेष्टांसह पार्टी किंवा सहलीचे बेत आखाल. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल.

धनु (Sagittarius) : हस्त कलेसाठी वेळ काढावा. हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल.

Advertisement

मकर (Capricorn) : व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius) : घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. कोर्ट कचेरी पासून जरा संभाळून रहा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल.

Advertisement

मीन (Pisces) : सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. जोडीदाराची बाजू जाणून घ्या. दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल.

Advertisement